जामखेड न्युज——
कवडीमोल कांदा भावामुळे संतप्त जामखेडच्या शेतकरी पुत्राचे कांदा पिकांवर रोटर फिरवण्यासाठी राष्ट्रपतींना अनुदानासाठी साकडे
सध्या कांद्याचे भाव एकदम गडगडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे अनेकांनी उभ्या पिकात नांगर फिरवला आहे. पण मेटाकुटीला आलेल्या बळीराजा कडे नांगर फिरवण्यासाठी पैसेच नाहीत. जामखेडचा शेतकरी पुत्र शुभम वाघ याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून कांदा पिकात रोटर फिरवण्यासाठी अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे.
जामखेडचा शेतकरी पुत्र शुभम वाघ याने राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पत्र लिहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दुरावस्था देशासमोर आणली आहे. राष्ट्रपती यांनीही पत्राची दखल घेत यावर मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
या पत्रात शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्यावर अशी वेळ येते आहे तसेच शेतीमालाची निर्यात होत नाही त्यामुळे कांद्यासह इतर पिकांना दर मिळत नाही या पिकांचे उत्पादन करताना वाढलेल्या महागाईने खुप खर्च होत आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव द्यावा ही विनंती केली आहे.
शेतीपिकांना कवडीमोल दर मिळत आहे कांदा विकुन दोन रूपयांची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते त्यामुळे शेती करायची कशी अशा आशयाचे पत्र राष्ट्रपती यांना लिहले आहे.
कांदा, कापूस यांसह इतर पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने जामखेड तालुक्यातील एका विद्यार्थ्याने चक्क राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठविले आहे. संतप्त झालेल्या या शेतकरी पुत्राने उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरविण्यासाठी किमान सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.
सहाशे-सातशे किलो कांदा विकून शेतकऱ्याला फक्त दोन रुपयांचा चेक देण्याची चेष्टा सोलापूर जिल्ह्यात घडली. नगर जिल्ह्यातही कांदा एक रुपया किलो दराने विकावा लागत आहे. शेतीचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. आंदोलनेही सुर झाली आहेत. याच अनुषंघाने राज्यसरकार लक्ष देत नसल्याने तालुक्यातील शुभम गुलाबराव वाघ या विद्यार्थ्याने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून आपली खंत व्यक्त केली गुलाबराव वाघ म्हणाले,
हजारोंचा खर्च करुन हातात काहीच पडत नसल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. दरम्यान, थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याचे धाडस करणाऱ्या या विद्यार्थ्याचे तालुक्यातून कौतूक होत आहे.