जामखेड न्युज——
पोलीस आजच्या काळातील संत – संभाजीराव गायकवाड
जामखेड तालुक्यातील गुन्हेगारी ढाचा हलवण्याचे काम केले पुढील अधिकाऱ्यांनी तो जमिनदोस्त करावा
समाजातील सर्व व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी पोलीस कायद्याच्या काठीने काम करतो यामुळे समाजव्यवस्था सुरळीत चालते म्हणून पोलीस हे आजच्या काळातील संत आहेत. जामखेड तालुका गुन्हेगारांचा तालुका म्हणून ओळखला जात होता मी सर्वांच्या मदतीने गुन्हेगारी ढाचा हलवण्याचे काम केले पुढील अधिकाऱ्यांनी करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले
जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची पारनेर पोलीस स्टेशन येथे बदली झाली आहे. यानिमित्ताने जामखेड येथील विविध समाज घटकातील मान्यवर पक्ष-संघटना यांच्यावतीने संभाजी गायकवाड यांना सन्मान पुर्वक निरोप देण्यात आला. आज दि. गुरुवार दि.०२/०३/२०२३ रोजी सकाळी १२.०० वाजता जामखेड पोलीस स्टेशन येथे जामखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड, पोलीस पाटील संघटना व पोलीस मित्र संघटनेच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात, सुरेश भोसले, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. अरूण जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडुराजे भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, मंगेश आजबे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, सचिव सत्तार शेख, विकी भाऊ सदाफुले, साहित्यिक आ. य. पवार, मुस्लिम नेते अजहर काझी, शेरखान भाई, प्रा. विकी घायतडक, प्रा. लक्ष्मण ढेपे, अमित जाधव, प्रहार संघटनेचे जयसिंग उगले, नय्युम शेख, वंचित बहुजन आघाडीचे बापूसाहेब ओव्हळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस पाटील संघटनेचे सिध्दनाथ पवार, सुंदरदास बिरंगळ, निलेश पवार, गृहरक्षक दलाचे डाॅ. सुरेश काशिद, कुंडल राळेभात, सिध्दीविनायक प्रतिष्ठाणचे सचिन देशमुख, बौद्ध महासभेच्या सुरेखा सदाफुले, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शैला आबा सदाफुले, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, भिमटोला सामाजिक संघटनेचे बापूसाहेब गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने, हभप वायसे महाराज, मौलाना खलील, जावेद सय्यद, माजी नगरसेवक शामीर सय्यद, केदार रसाळ, सम्राट अशोक घोडेस्वार, संजय लाटे, प्रवीण उगले, समीर पठाण, गफार पठाण, विकास राळेभात, गुलशन अंधारे, डॉ. एस. बी. राव, वंचीतचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, अकबर तांबोळी, अमीत गंभीर आदी मान्यवरांंसह सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, पोलीस पाटील व सर्व समाज घटकातील विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संभाजीराव गायकवाड म्हणाले की, आईवडील, महापुरुष व पुस्तके यांच्या माध्यमातून मिळालेल्या संस्कारांमुळे आज मला तुमचे प्रेम व आदर मिळत आहे. हे मी कधीही विसरणार नाही. जामखेडची गुन्हेगारी कमी करण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, विविध सामाजिक संघटना, पक्ष, सामाजिक कार्यकर्ते अश्या सर्व समाज घटकांचा सहभाग आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकत मिळाली आहे. आपले जन्मोन्मांतरी काही नाते असेल म्हणून आज आपण एकत्र आलो. आपणा सर्वांचे ऋणानुबंध कायम राहतील यासाठी काम करू. असे प्रतिपादन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
पुढे बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, सरकारी नोकरी करणार्या एखाद्या व्यक्तीला एवढा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
पोलीस खात्यात आल्यानंतर अगोदर पोलीस समजून घेतले. माझा स्वभाव सामाजिक दृष्टिकोनातून तयार झालेला आहे.
या ठिकाणी आल्यावर अगोदर पोलीस स्टेशनला व पोलीस कर्मचारी व अधिकारी,पत्रकार, वकील व सर्वच पक्ष संघटना व समाज घटकातील व सर्व स्तरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला. हे माझ्या कामाचे मोठे यश आहे. तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ माझे अवयव होते. सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या सांघिक प्रयत्नातून आंतरराज्य गुन्हेगार, गावठी कट्टे, सावकारी अशा अनेक पातळ्यांवर चांगले काम करता आले. मी जामखेड तालुक्यातील गुन्हेगारीचा ढाचा हलवण्याचे काम केले. पुढील अधिकारी तो जमिनदोस्त करण्याचे काम करतील. पत्रकारांनीही चांगले काम केले. त्यांचेही चांगले सहकार्य लाभले. निष्पक्षपणे त्यांनी काम केले. असेही वक्तव्य पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपापले अनुभव कथन करत संभाजी गायकवाड यांना पुढील आयुष्य व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.