धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

0
245

जामखेड न्युज——

धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव, ता.जामखेड याठिकाणी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडे, गीत,भाषणे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.


शिवजयंती निमित्त शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित सामान्यज्ञान/प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोवाडा गायन स्पर्धा, स्फूर्तीगीत गायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

 

सदर कार्यक्रमास धामणगाव ग्रामपंचायतचे सरपंच-उपसरपंच-सदस्य, सोसायटीचे चेअरमन-व्हाईस चेअरमन-सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष-सदस्य, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.रुपेश वाणी सर, शिक्षकवृंद- श्री.किसन वराट सर, श्री.नारायण लहाने सर, श्री.चंद्रकांत पांडुळे सर, श्री.अर्जुन होले सर, श्री.गणेश काटे सर, श्री.एकनाथ गायकवाड सर, श्रीमती स्वाती गोरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नारायण लहाने सर तसेच आभार प्रदर्शन श्री.रुपेश वाणी सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here