पदवीधर मतदारसंघासाठी जामखेड तालुक्यात दुपारी दोन पर्यंत चाळीस टक्के मतदान जामखेड मतदान केंद्रावर मतदारांची रांगा

0
176

जामखेड न्युज——

पदवीधर मतदारसंघासाठी जामखेड तालुक्यात दुपारी दोन पर्यंत चाळीस टक्के मतदान

जामखेड मतदान केंद्रावर मतदारांची रांगा

पदवीधर मतदारसंघासाठी जामखेड तालुक्याचे एकूण मतदान 2054 एवढे आहे. यात पाच मतदान केंद्र आहेत. यापैकी सर्वात जास्त मतदान जामखेड केंद्रावर आहे. त्यामुळे सकाळपासून जामखेड केंद्रावर मतदारांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत तालुक्यातील एकुण 840 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

जामखेड तालुक्यात जामखेड मतदान केंद्रावर एकुण 1108 मतदार आहेत, अरणगाव 298, नान्नज 186, खर्डा 271, नायगाव 191 असे एकूण 2054 मतदार आहेत.

दुपारी दोन वाजेपर्यंत

 

जामखेड केंद्रावर 480 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजे 43.32 टक्के,

अरणगाव 93 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजे 31.21 टक्के,

नान्नज केंद्रावर 74 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजे 39.78 टक्के,

खर्डा केंद्रावर 121 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजे 44.65 टक्के,

नायगाव केंद्रावर 72 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजे 37.70 टक्के अशा प्रकारे दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे 840 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजे 40.90 टक्के मतदान झाले होते.

जामखेड केंद्रावर 1108 मतदार आहेत आणि एकच मतदान केंद्र असल्याने या केंद्रावर सकाळपासून गर्दी दिसून आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here