जामखेड न्युज——
सत्यजित तांबेंसाठी मी जामीनदार – आमदार डॉ. सुधीर तांबे.
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सत्यजित तांबे यांची राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा
सत्यजित तांबे यांचा सर्व क्षेत्रातील अभ्यास चांगला आहे. जुन्या पेन्शन योजने संदर्भात सत्यजित तांबे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री यांच्या बरोबर चर्चा केली आहे महाराष्ट्रात लागू करण्यासाठी याचा उपयोग होईल. तसेच शिक्षक भरती प्रक्रिया बंद आहे ती सुरू झाली पाहिजे याचबरोबर विनाअनुदानित वर काम करणाऱ्या शिक्षकांना पगार मिळाला पाहिजे या विषयावर सत्यजित हे आवाज उठवतील असा विश्वास आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. व सत्यजित तांबे यांच्या साठी मी जामीनदार आहे त्याच्या कडून आपण सर्व प्रश्न सोडवून घेऊ असे आमदार तांबे यांनी सांगितले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी आज आमदार डॉ. सुधीर तांबे ल. ना. होशिंग विद्यालयात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार, ज्ञानदेव वाफारे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, ज्योतीताई गोलेकर, शहाजीराजे भोसले, भानुदास बोराटे, काँग्रेसचे राहुल उगले, शिवाजीराव ढाळे, उपमुख्याध्यापक रमेश अडसुळ,पर्यवेक्षक बी. ए. पारखे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पी. टी. गायकवाड, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, अनिल देडे, भरत लहाने, प्रा. अविनाश फलके, पोपट जगदाळे, विशाल पोले, हनुमंत वराट यांच्या सह अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, मला सुरवातीपासूनच शिक्षकांचा पाठिंबा लाभला आहे. मीही शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्पर राहिलो. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात माजी उपमुख्यमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार व विद्यमान उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोघांची उत्तरे जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सारखीच आहेत. सचिव लोक गैरसमज निर्माण करतात. जुनी पेन्शन योजनेसंदर्भात ज्या राज्यांनी लागू केली त्या राज्यात जावून अभ्यास करून सचिव लोकांपुढे मांडणी करणार आहोत.
जुनी पेन्शन योजना, 2005 पुर्वीचे व नंतरचे
विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान, शिक्षक भरती याबाबत निश्चित आवाज उठवला जाणार आहे. दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षक भरती आवश्यक आहे असेही तांबे यांनी सांगितले.
तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संघटना व टीडीएफ च्या वतीने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला.
यावेळी प्रस्ताविक करताना माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पी. टी. गायकवाड म्हणाले की, पोटतिडकीने शिक्षकांचे प्रश्न मांडण्यात तांबे साहेबांचा हातखंडा आहे तरूण चेहरा उदयास येत आहे. तांबे साहेबांचा वारसा सत्यजित निश्चित चालवतील अशी खात्री व्यक्त केली.
यावेळी शिक्षक संघटनेचे नेते शिवाजीराव ढाळे म्हणाले की, पाच जिल्हे, 54 तालुके, विविधता असलेला हा मतदारसंघ आहे शिक्षक आमदार नाही हि उणीव तांबे साहेबांनी भरून काढली, पदवीधराबरोबर शिक्षकांचे प्रश्न सोडविले. जामखेड तालुक्यातून मोठे मताधिक्ये देऊ असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभार प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी मानले.