जामखेड न्युज—-
दादासाहेब मोहिते मित्रमंडळच्या वतीने माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप
माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. दादासाहेब मोहिते मित्रमंडळच्या वतीने साकत परिसरातील पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना तसेच अंगणवाडी येथील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यामुळे चिमुकल्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.
आज माजी मंत्री व आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळवाडी,अंगणवाडी येथील मुलांना प्रा.दादासाहेब मोहिते यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच दिलीप घोलप, ग्रामपंचायत सदस्य वाल्मीक दादा कोल्हे, व्हा.चेअरमन दादा नेमाने, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दत्ता घोलप, मुकुंद नेमाने, वसंत नेमाने, सुग्रीव नेमाने, डॉ.सतीश घोलप, नितीन मोहिते, जालिंदर नेमाने, काकासाहेब टेकाळे
बाबुराव घोलप, आदर्श घोलप, रोहित मोहिते तसेच शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, गणेश देवकते, तसेच अंगणवाडी सेविका जिजाबाई घोलप तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.