आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे कोण निवडून येणार कार्यकर्त्यांच्या लागल्या लाखो रूपयांच्या पैजा

0
319

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे कोण निवडून येणार कार्यकर्त्यांच्या लागल्या लाखो रूपयांच्या पैजा

एक एक लाखाचे चेक दिले मध्यस्थी कडे

  कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण खूपच तप्त आहे. अनेक कामावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. दोन्ही आमदारांमध्ये जशी श्रेयवादावरून लढाई आहे तशीच कार्यकर्त्यायाची लढाई आहे. एखाद्याला कामाबाबत एखादी पोस्ट पडली की लगेच विरोधकांचे सोशल मीडियावर मेसेज येत आहेत. हे काम आमचेच आहे असे सांगितले जाते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वाँर सुरू आहे. 
   सध्या राष्ट्रीय महामार्ग, पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी तसेच इतर अनेक कामांबाबत श्रेयवादाची लढाई सुरू आहे. आता तर हि लढाई पैजेवर गेली आहे लाखो रुपयांच्या पैजा लागल्या आहेत. 
    आमदार रोहित पवार समर्थक अरणगाव येथील विशाल डोळे तर आमदार प्रा. राम शिंदे समर्थक जायभाय वंजारवाडी  येथील प्रदिप (बंडू) जायभाय या दोघांची एक एक लाख रुपयांची पैज लागली आहे. 
२०२४ ची विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत विशाल डोळे म्हणतात आमदार रोहित पवार विजयी होणार तर प्रदिप (बंडू) जायभाय म्हणतात आमदार राम शिंदे निवडून येणार अशी दोघांमध्ये एक एक लाख रुपयांची पैज लागली आहे. दोघांनीही एक एक लाखाचा चेक विष्णू जायभाय यांच्या कडे मध्यस्थी म्हणून ठेवला आहे. यामुळे मतदारसंघात एकच चर्चा सुरू झाली आहे. 
     २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पैजा सुरू झाल्या आहेत. मतदारसंघात एकच चर्चा सुरू झाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here