जामखेड न्युज——
अधिकाऱ्यांचे निलंबन करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न – प्रा. मधुकर राळेभात
कर्जत-जामखेड प्रति बारामती होत आहे हे देखवत नसल्याने निलंबन
प्रमाणित अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
राम शिंदे आमदार असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध क्रेशर सुरू होते याकडे ते डोळेझाक करत होते. सध्या मतदारसंघात विकासकामे जोरदार सुरू आहेत हे आमदार प्रा. राम शिंदे यांना देखवत नाही म्हणून प्रमाणित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची व बदलीची कारवाई द्वेष भावनेतून आमदार शिंदे करत आहेत असे प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.
प्रांताधिकारी अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे निलंबन तसेच कर्जतचे मुख्याधिकारी व जामखेडचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली हे दोष भावनेतून केले आहे यांच्या निषेधार्थ तर अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, नगरसेवक मोहन पवार, सुर्यकांत मोरे, राजेंद्र पवार, सुरेश भोसले, समीर पठाण, प्रकाश काळे, मनसेचे हवा सरनोबत, प्राचार्य विकी घायतडक,अमोल गिरमे, बजरंग डुचे, राहुल अहिरे, महेश राळेभात, अमित जाधव, हरीभाऊ आजबे, पवन राळेभात, प्रशांत राळेभात, शरद शिंदे, उमर कुरेशी, मनोज भोरे, हरीभाऊ ढवळे, युवराज उगले, अँड हर्बल डोके,घळौ नरेंद्र जाधव, जुबेर शेख, राजेंद्र गोरे, पिंटू बोरा, सुंदरदास बिरंगळ, अमर चाऊस, खर्डाचे उपसरपंच श्रीकांत लोखंडे,प्रविण दादा उगले यांच्या सह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, कर्जत-जामखेड प्रति बारामती होत असताना विकास देखवत नाही. मागच्या दाराने आलेल्या आमदाराला हे देखवत नाही. त्यांना प्रभारीराज ठेवून अनाधिकृत कामे करणारे अधिकारी हवे आहेत. विकास देखवत नाही. ज्या अधिकाऱ्यांनी कर्जत-जामखेड ला विविध विकास कामात जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अग्रेसर ठेवले अशा प्रमाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले जात आहे. अधिकारी निलंबन करून दहशत निर्माण करणे व अनाधिकृत कामे करून घेणे यासाठी हा खटाटोप सुरू आहे.
यावेळी सुरेश भोसले, नरेंद्र जाधव, श्रीकांत लोखंडे, समीर पठाण, सुर्यकांत मोरे, रमेश आजबे,अमोल गिरमे, शरद शिंदे, दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी यांनी मनोगते व्यक्त केली. आमदार राम शिंदे यांच्या कृतीचा जाहीर निषेध केला व प्रमाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे सांगितले.
यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कर्जत जामखेड मध्ये एक निषेधार्ह घटना घडली, ती म्हणजे स्वतःच्या इगोपोटी कर्जत येथील तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे व प्रांत अधिकारी श्री. अजित थोरबोले यांची विधान परिषदेमध्ये निलंबनाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या निलंबनाचा आग्रह विधान परिषदेचे सदस्य राम शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये आकांडतांडव करून महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निलंबनाची घोषणा करावयास भाग पाडले, पहिले निलंबन व नंतर विभागीय चौकशी अशी विरोधाभास व उलटी कारवाई विधानपरिषद मध्ये करावयास लावली आहे हा सरासर कर्जत तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्यावर अन्याय असून विभागीय चौकशीत दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे परंतु कुठेतरी कर्जत नगरपंचायतीतील निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून पूर्वग्रहदूषित मनाने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा मंत्र्यांना करावयास लावणे म्हणजे कर्जत जामखेड मधील प्रामाणिक अधिकाऱ्यांवर सरळ सरळ अन्याय असून व इतरांवर दहशत ठेवणे हा त्यांचा सरळ सरळ हेतू आहे. त्यांच्या स्वतः च्या (राम शिंदेच्या) पालकमंत्र्यांच्या कालावधीमध्ये कर्जत जामखेड मध्ये जाणीवपूर्वक प्रभारी राज ठेवले होते, सतेचा दुरुपयोग करून घेणे व आपल्या बगलबच्चांना सत्तेचा लाभ मिळवून देणे हाच हेतू प्रभारी राज मध्ये होता गेल्या तीन वर्षामध्ये आमदार रोहित दादा पवार यांच्या कारकिर्दीमध्ये व महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार रोहित दादा पवार यांनी हे प्रभारी राज संपुष्टात आणून कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यात प्रत्येक खात्याला रेग्युलर अधिकाऱ्याची नियुक्ती केली परंतु आता राम शिंदे विधानपरिषद आमदार झाल्यापासून व ED सरकार आल्यापासून पुन्हा एकदा प्रामाणिक व रेग्युलर अधिकाऱ्यांवर अन्याय चालू झाला आहे .यामध्ये पुन्हा एकदा प्रभारी राज आणण्याचा डाव आहे याचा आम्ही सर्व निषेध करीत आहोत.असे निवेदनात म्हटले आहे.