जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट.) –
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मध्ये आमदार रोहित पवार यांनी 400 बेड चे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे या कोविड सेंटरच्या स्वच्छतेसाठी प्रविण उगले यांच्या कडून डस्टबीनचे मोफत वाटप करण्यात आले यामुळे कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल.
याप्रसंगी आरोळे कोविड सेंटरमधील सुलताना भाभी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी प्रविण (दादा)उगले, कृषी भूषण रवींद्र कडलग, मयुर भोसले सर, महेश यादव, लखन राळेभात,आमीर शेख, शशी म्हेत्रे आदी उपस्थित होते.
