जामखेड न्युज——
पाच दिवसात गुन्हेगारांना अटक झाले नाही तर व्यापाऱ्यांच्या वतीने जामखेड बंद ठेवणार – रमेश आजबे
अंदूरे कुटुंबावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी एक महीना होऊनही अद्याप फरार आहेत. त्याच बरोबर सध्या यातील आरोपी डॉ. भगवान मुरुमकर यांच्यावर गुन्हा दाखल असुनही वाढदिवसाचे शहरातील चौका – चौकात बोर्ड लावले आहेत असे असतानाही पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे येत्या मंगळवार पर्यंत यातील आरोपींना अटक केली नाही तर बुधवारी जामखेड शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने जामखेड बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
पुढे बोलताना रमेश आजबे म्हणाले की एक महीन्या पुर्वी अंदुरे कुटूंबावर डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या टोळीने हल्ला केला होता. या प्रकरणी या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे व खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सध्या हे आरोपी व्हॉटसप व फेसबुकच्या माध्यमातून इतर लोकांच्या संपर्कात आहेत मात्र हे पोलीस प्रशासनाला दिसत नाहीत का?
आज दि १ डिसेंबर रोजी तर यातील आरोपी आसलेले डॉ. भगवान मुरूमकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील चौका चौकात शुभेच्छाचे बोर्ड लागले आहेत. याबाबत यांना प्रशासनाची परवानगी घेतली आहे का? आणि घेतली नसेल तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही.
व्यापारी अंदुरे कुटूंबावर हल्ला करणाऱ्या फरार आरोपींचे बोर्ड लागत आहेत त्यामुळे आमचे कोणी काही करु शकत नाहीत असा समज निर्माण झाला आहे. तसेच जामखेड पोलीस स्टेशनला काही सिंघम म्हणून घेणार्या अधिकार्यांनी एक महीना होऊनही आरोपी अटक केली नाही. तसेच या बाबत पोलिसांबरोबर काही देवाण घेवाण तर झाली नाही ना? असा आरोपही रमेश आजबे यांनी बोलताना केला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींना मंगळवार पर्यंत अटक झाली नाही तर बुधवारी जामखेड शहरातील व्यापाऱ्यांच्या समवेत जामखेड शहर बंद ठेऊन तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.