अँड. डॉ. अरूण जाधव यांच्या मुळेच गोरगरीब अतिक्रमण धारकांना दिलासा शासनदरबारी दखल, अतिक्रमण होणार अधिकृत? 

0
141

जामखेड न्युज——

अँड. डॉ. अरूण जाधव यांच्या मुळेच गोरगरीब अतिक्रमण धारकांना दिलासा!!! 

शासनदरबारी दखल, अतिक्रमण होणार अधिकृत? 

गोरगरिबांचे कैवारी अँड. डॉ. अरुण आबा जाधव
यांनी शासनाच्या अतिक्रमण हटाव धोरणा विरोधात
गोरगरीब जनतेला एकत्र घेऊन जन आंदोलन उभारले होते. जामखेड, कर्जत, श्रीगोंदे येथे तहसील कार्यालयावर विराट भव्य आंदोलने केली होती. अतिक्रमण हटवून देणार नाही असे शासनाला ठामपणे अरूण जाधव यांनी सांगितले होते याची दखल घेत शासनाने अतिक्रमण जैसे थे ठेवून अतिक्रमण अधिकृत घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे जाधव यांच्या लढ्याला यश आले आहे.

महाराष्ट्रातील गायरान जमिनी निष्काशित करा या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सन्मानपूर्वक शांततेच्या मार्गाने अरुण आबा जाधव यांनी विविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने करून गोरगरीब अतिक्रमण धारकांचे प्रश्न शासन दरबारी मांडले. या लढ्याची सुरुवातच मुळात अँड. डॉ. अरुण आबा जाधव यांनी केली होती.

आणि महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अतिक्रमण धारक सुखावला आहे. अरुण आबा जाधव यांच्या लढ्याला सलाम …एकीकडे पुढार्‍यांच्या तोंडाला साप चावल्यासारखे दिसत होते.. परंतु हा गोरगरिबांचा कैवारी मैदानात एकटाच लढताना दिसत होता.

खरंच आबा… आपण अतिक्रमण धारकांच्या जीवन मरणाच्या प्रसंगात विचार न करता लढत राहिलात आणि आज या लढ्याला यश मिळाले तुमच्या या गोरगरिबांच्या प्रति असलेल्या प्रेमाला सलाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here