शहरातील व्यावसायिकांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा – नगरसेवक मोहन पवार

0
198

जामखेड न्युज——

शहरातील व्यावसायिकांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा – नगरसेवक मोहन पवार

शहरातील छोट्या व्यवसायीकांसाठी केंद्र सरकारने पी. एम. स्वनिधी बीन व्याजी २० हजार रुपये कर्ज योजना सुरू केली असून या योजनेचा शहरातील व्यवसायीकांसाठी लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे.

छोटे व्यवसायीक जसे की, भाजीपाला विक्रेते, फळविक्रते, सलुन, इस्त्री, छोटे स्टेशनरी, कटलरी, खेळण्याचे दुकान, बेकरी उत्पादन विक्रेते, पान टपरीधारक, चहा टपरीधारक, छोटे किरणा व्यवसाईक, गृह उद्योग, मोटारसायकल गॅरेज आदी अशा व्यवसायीकांसाठी जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून कर्ज प्रकरणासाठी अर्ज स्वीकारण्यात येत असून याबाबत अडचण आल्यास संपर्क करण्याचे आवाहन माजी नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे.

   जामखेड शहरासह आपल्या प्रभागातील सार्वजनिक विकास कामाबरोबरच वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी मोहन पवार हे नेहमीच अग्रेसर असतात. या नुसारच केंद्र सरकारने सुरू केलेल्या १५ ते २० हजार रुपयांपर्यंत कर्ज योजनेसाठी त्यांनी आपल्या प्रभागाबरोबरच शहरातील अनेक छोट्या व्यवसायीकांशी संपर्क करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन व जनजागृती केले आहे.

याबाबत पात्र लाभार्थ्यांनी नगरपरिषदेशी संपर्क करावा किंवा काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन मोहन पवार यांनी केले आहे. यासाठी त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर 9766622207 जाहीर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here