माढा तालुक्यातील बेंबळे येथील आण्णा भोसले यांची ऊसतोड कामगारांनी केली हत्या

0
295

 

जामखेड न्युज——

माढा तालुक्यातील बेंबळे येथील आण्णा भोसले यांची ऊसतोड कामगारांनी केली हत्या

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे येथील वाहनमालक प्रशांत उर्फ आण्णा महादेव भोसले हे आपल्या उसतोड कराराची टोळी आणण्यासाठी आपल्या भाच्याला घेवुन सेंधवा मध्यप्रदेश येथे परवा गेले होते. टोळी वाहनात घेवुन येत असताना याच मजुरांनी आण्णा भोसले यांना अवघड जागी बेदम मारहाण करुन निर्घृण खुन करुन रस्त्यावर टाकून पळुन गेल्याची तक्रार आण्णासाहेब भोसले यांच्या नातेवाईकानी दिली आहे. मृत देहाचे शवविच्छेदन शिरपुर येथील प्रा.आरोग्य केंद्रात करण्यात आले यामुळे परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

ऊसतोड टोळ्या वाहन मालकांना गंडा घालून काही फरार झाल्या तर काही आल्याच नाही. त्यामुळे मुजराकडून वाहन मालकांना फसवण्याचे, मारहाण करण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक वाहन मालकांना मजुराविना रिकामा हाताने निराश होऊन परतण्याची वेळ आली आहे.

एकट्या बेंबळे परिसरातील जवळपास 36 टोळ्यांनी 36 वाहन मालकाला दगा दिल्याने एकाच गावात जवळपास कोट्यावधी रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार झाला असून परिणामी या प्रकारामुळे वाहन मालकाची लाखो रुपयांची फसगत झाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

यामुळे ऊस तोडणीसाठी मजूर मिळणे मुश्किल झाले असून त्यामुळे ऊस तोडणीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात 35 ते 40 कारखाने असून वाहन मालकातून आपल्या परिसरातील कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी बीड, जालना, धुळे, नंदुरबार ,अहमदनगर, मध्य प्रदेश मधील सेंधवा, चोपडा, शिरपुर तर काही आदिवासी भाग, आदी स्थानिक व विविध ठिकाणातून मजुरांचा शोध घेऊन त्यांना लाखो रुपयांच्या उचली दिल्या जातात.

सदर मजूर आपल्या परिसरात आणण्यासाठी ज्यावेळी वाहन मालक तिकडे जातात. त्यावेळेस त्यांची फसवणूक करून वेळप्रसंगी मारहाण करून त्यांना मोकळ्या हाताने परत लावतात. त्यामुळे कोट्यवधी रुपये मजुराच्या हाती देऊन पुन्हा रिकाम्या हाताने परत यावे लागते. त्यातच ऊसतोड मजुरीसाठी कारखान्याकडून वाहन मालकाच्या, वाहनावर, शेतात उभ्या ऊसावर उचल घेऊन मजुराच्या हाती देऊन रिकामी होताना दिसत आहेत.

त्यामुळे कारखानदार दिलेली उचल वसुल करताना वाहन मालकाचे वाहन ओडुन नेवुन,ऊस पीक तोडून नेऊन त्याची वसुली केली जाते. त्यामुळे वाहन मालक दोन्ही बाजूने अडचणीत येतोय.
यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे .त्यामुळे वाहन मालकाची ऊस तोडणी मुजराच्या टोळ्या आणण्यासाठी धावपळ चालू आहे.

बहुतांश प्रमाणात टोळ्या आल्या आहेत आणि प्रत्यक्षात ऊसतोडी चे काम चालू झाले आहे. परंतु अनेक टोळ्या आल्या नाहीत तर काही टोळ्या तेथील स्थानिक पीक सोयाबीन कपाशी काढून झाल्यानंतर येणार असं मुकादमा कडुन सांगितले जाते परंतु पुढे तसं होत नाही. दोन-तीन मालकाकडून उचल घेणे आणि तिसऱ्याच मालकाकडे ऊस तोडणी साठी जाणे असा प्रकार होत असल्यामुळे एक मुकादम टोळी तीन ते चार ठिकाणच्या उचली घेताना दिसत आहे.

मात्र ज्यावेळी मजूर आणण्यासाठी वाहन मालक त्या भागात गेल्यानंतर मजूर सापडत नसल्याने रिकाम्या हाताने परतावं लागत आहे यामुळे वाहनधारकाची मोठी गोची झाली आहे. कारखानदार दिलेली ऊचल सोडत नाहीत आणि मजूर दिवसाढवळ्या लुटत आहे त्यामुळे वाहन मालक- शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दरवर्षी दबला जात आहे. त्यातच कारखान्याकडून मजुराची,त्यांना दिलेल्या उचलीची आणि मुकादामाची कसलीच जबाबदारी घेतली जात नसल्यामुळे वाहन मालक मजूर आणि कारखानदार या दोन्हीच्या कचाट्यात सापडला आहे.

वाहन मालक टिकला तरच कारखाना टिकतील–
शेतातील ऊस गाळपासाठी कारखान्याला जाणे हे जेवढे शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे तेवढेच कारखान्याचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालणे हे सुद्धा कारखानदाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे यासाठी ऊस तोडणी यंत्रणा मजूर किंवा यांत्रिक पद्धतीने सक्षम असणे महत्त्वाचे आहे एक वाहन मालक कारखान्याला वाहन चालवण्यासाठी चार लाख पासून ते दहा लाखापर्यंत ऊस तोडणी कामगारांना उचली द्यावी लागल्या आहेत परंतु ऊस तोडणी मजूर दिवसेंदिवस वाहन मालकांना दंडा घालून दुसऱ्या कारखान्यात जात आहेत हा प्रकार थांबवण्यासाठी संपूर्ण कारखानदार वर्गाने पुढाकार घेऊन योग्य ती पावले उचलली पाहिजेत. मजुराची, मुकादामाची आणि त्या उचलीची हमी कारखाने सुद्धा घेतली पाहिजे असे वाहन मालकातून मागणी होताना दिसत आहे. कारण वाहन मालक टिकले तरच कारखानदारी टिकणार आहे मजूर नाही आला मजुरानी वाहन मालकाला फसवून गंडा घातला तर याचे परिणाम पुढील काळात कारखानदारांना भोगावे लागणार आहेत हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here