ढेपे कुटुंबातर्फे मुस्लिम बांधवासाठी फराळाचे आयोजन

0
167

जामखेड न्यूज—–

ढेपे कुटुंबातर्फे मुस्लिम बांधवासाठी फराळाचे आयोजन

गुरेवाडी महारूळी सरपंच अंजली ढेपे व सामाजिक कार्यकर्ते प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी दिपावली सणानिमित्त मुस्लिम बांधवांना फराळाचे आयोजन केले होते. यावेळी जामखेड शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खलील मौलाना, भाजपा अल्पसंख्याकचे सलीम बागवान, अझर काझी, मुक्तार सय्यद, जमीर बारूद, उमर कुरेशी, इस्माइल सय्यद, शामीर सय्यद, 

अकबर तांबोळी, वसीम मंडप, वसीम बिल्डर, राजाभाऊ बागवान, फिरोज बागवान,शाकीर खान,अल्ताफ शेख, जुबेर शेख, खुदुस भाई, मुज्जु पठाण, इस्माईल पाटेवाले, बिल्लाल शेख, जाकीर शेख सर, पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, नासीर चाचू, अमोल गिरमे, डॉ. कैलास हजारेअसतो यांच्या सह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

गुरेवाडी महारूळीच्या सरपंच अंजली ढेपे आहेत त्यांचे पती पत्नी प्रा. लक्ष्मण ढेपे हे समाज कार्यात अग्रेसर असतात. अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात.

यावेळी जामखेड न्यूजशी बोलताना कार्यक्रमाचे आयोजक प्रा. लक्ष्मण ढेपे म्हणाले की, समाजातील सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी असे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांचे मनःपुर्वक स्वागत केले. 

यावेळी खलील मौलाना म्हणाले की,
राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी ढेपे कुटुंबीयांचा नेहमीच पुढाकार असतो. असे कार्यक्रम आवश्यक आहेत. ईद मध्ये अनेक ठिकाणी शिरखुर्मा पार्टी असते पण दिवाळीत प्रथमच ढेपे कुटुंबाने दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here