जामखेड न्युज——
पंचायत समिती सर्वसामान्य लोकांची आहे ठेकेदार व नेत्यांची नाही -डॉ.भगवानराव मुरूमकर
रोजगार हमीतुन वीस शाळांचे वाँलकपाऊंड करणारा जामखेड तालुका पहिला -गटविकास अधिकारी प्रकाश पोळ
पंचायत समितीच्या मार्फत सर्व सामान्य लोकांचे कामे मार्गी लागावीत म्हणून आहे. फक्त ठेकेदार व नेत्यांची कामे लावण्यासाठी नाही हे २०१२ते २०१७ च्या काळात दाखवून दिले आहे. असे मत पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी व्यक्त केले.

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पूभाई सय्यद, डॉ.विठ्ठल राळेभात, लक्ष्मण ढेपे, आण्णा ढवळे, जाकीर शेख, प्रतिक मुरूमकर, अमोल वराट, प्रशांत सातपुते, युवराज पाटील, बी.के.माने, गणेश डोके, अमोल हजारे, डॉ.कासम,शेख यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मुरूमकर म्हणाले की, प्रकाश पोळ साहेब यांचे नाव प्रकाश हे सार्थ ठरवले आहे. रोजगार हमी योजनेत तालुका प्रथम क्रमांकावर आणला आहे. पोळ साहेबांनी सर्वाना विश्वासात घेत आदर्श काम केले आहे. याच कामाची शिदोरी व सामान्य लोकांचा विश्वास कायम आपल्या बरोबर आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना व सत्काराला उत्तर देताना सांगितले की, एक वर्षापूर्वी जामखेड मध्ये आलो भौगोलिक व सामाजिक अभ्यास केला यानुसार नियोजन केले. शाळाबाह्य विद्यार्थी मोठे होते योजना आखली व शाळाबाह्य प्रमाण शून्यावर आणले.

जामखेड तालुक्यात सर्वाना विश्वासात घेत कामाला सुरुवात केली. रोजगार हमी योजनेतून वीस शाळांचे वाँलकपाऊंड केले पहिला तालुका ठरला आहे. मी वेगळे असे काही केले नाही माझे काम करत गेलो. यात डॉ. भगवानराव मुरूमकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. मी काम करताना तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून काम केले.

यावेळी जाकीर शेख सर, प्रा. लक्ष्मण ढेपे, अमोल हजारे यांनी मनोगत व्यक्त केले व वाढदिवसानिमित्त गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांना शुभेच्छा दिल्या.
शेवटी आभार विस्तार अधिकारी बी.के.माने यांनी मानले





