जामखेड न्युज——
दोन दिवसांपासून बीएसएनएल सेवा बंद असल्याने ग्राहक हैराण
जामखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बीएसएनएलचे ग्राहक आहेत पण पण काही काळ लाईट गेली किंवा केबलच्या अडचणी मुळे वारंवार बीएसएनएल फोन व लँडलाईन सेवा बंद पडत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.

जामखेड परिसरात सुमारे पाचशेच्या आसपास लँडलाईन फोन धारक व मोठ्या प्रमाणात मोबाईल धारक संख्या आहे. गेल्या महिन्यांपासून बीएसएनएलचे फोन वारंवार बंद पडत असल्याने ग्राहकांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अनेक वेळा तर एक दोन तास लाईट गेली तरी बीएसएनएल कार्ड धारकाचे फोन लागत नाहीत फोन बंद असतात यामुळे अनेकांनी तर आपल्या सीमचे दुसऱ्या कंपनी मध्ये रूपांतर केले आहे. यामुळे बीएसएनएल ग्राहकांची संख्या कमी होत आहे.

अनेक ग्राहकांच्या मते बीएसएनएल कंपनी मध्ये खराब काँलीटीच्या बँटऱ्या वापरल्या जातात त्यामुळे लाईट गेली की फोन बंद पडतात दुसऱ्या कंपनीचे चालू असतात नेमके बीएसएनएल का बंद पडते असा संतप्त सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत.

याविषयी बीएसएनएलचे अधिकारी निकाळजे यांच्याशी जामखेड न्युजने संपर्क केला असता ते म्हणाले की, सध्या जामखेड परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे कामे सुरू आहेत त्यामुळे केबल तुटते व फोन बंद पडतात.

बीएसएनएल कंपनीने चांगल्या दर्जाच्या बॅटरी वापराव्यात व ग्राहकांना चांगल्या दर्जाची सेवा द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चौकट
काल दुपारपासून बीएसएनएल सेवा बंद होती आज दुपारी सुरू झाली आहे सुमारे चोवीस तास सेवा बंद होती





