Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या दीपोत्सवानिमित्त वंचितांना प्रकाशदान-दीपदान करण्याचे आवाहन-योगेश अब्दुले

दीपोत्सवानिमित्त वंचितांना प्रकाशदान-दीपदान करण्याचे आवाहन-योगेश अब्दुले

0
224

 

जामखेड न्युज——

दीपोत्सवानिमित्त वंचितांना प्रकाशदान-दीपदान करण्याचे आवाहन-योगेश अब्दुले

दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणांस आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा देत असतांना स्नेहालय’च्या वतीने आपणांस आवाहन करण्यात येत की आपण वंचित,शोषित, उपेक्षित,दुर्लक्षितांसाठी प्रकाशदान-दीप दान करावे.दीपोत्सवात आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो.

प्रत्येक घरात फटाके,दिवाळीचे फराळ,मिठाई,खाऊ,सुगंधी अत्तर,आवडीचे नवे कपडे अशी रेलचेल असते.परंतु त्यावेळी आपल्याच अवती-भवतीच्या समाजातील अनेक बंधू-भगिनी, विशेषतः करून बालके या आनंदापासून वंचित असतात.त्यात विविध संस्थांमधून राहणारी विशेष क्षमतायुक्त दिव्यांग,अनाथ-निराधार- एड्सग्रस्त-मतिमंद-मूकबधिर-

अंध-अस्थिव्यंग-अपंग-स्वमग्न आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचा समावेश असतो.त्यांच्यासोबत कौटुंबिक अत्याचार आणि देहव्यापरातील बळी महिलांचे अंधारलेले आयुष्य दीपोत्सवाने उजळावे यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.दिवाळीच्या आनंदात आपण या वंचितांना सहभागी करून घ्यावे.त्यामुळे आपले जीवन अर्थपूर्ण होते.दीपोत्सवाचा आनंद शतगुणित होतो.यंदाच्या दिवाळीत तुम्ही त्यांच्यासाठी प्रकाशाचे दान द्यावे,ही विनंती.

प्रत्येकी एक कापडाचा- एक अंगाचा साबण,कंगवा,नेलकटर,सॉफ्ट टुथब्रश आणि टुथपेस्ट,१०० मिलि तेलाची बाटली,उठणे, पावडर डब्बा असा संच/किट आपण देणगी म्हणून द्यावा.निवासी संस्थांमधून राहणाऱ्या, आश्रमशाळेमधील तसेच झोपडपट्टीतील बालकांची दिवाळी आपण या सहयोगातून आनंदमय करू शकतो.या उपक्रमातून २० हजार वंचित बालकांपर्यंत आपल्या मदतीने ‘आपले प्रकाशाचे दान’ पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे.

स्नेहालय स्नेहसक्षम प्रकल्प,दौलत कॉम्प्लेक्स,दुसरा मजला,तहसील कार्यालयाच्या समोर मु.पो.ता.जामखेड जि.अहमदनगर येथे प्रकाश दान स्वीकारले जाईल.जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले मो.नंबर- ९४२०३३९९४३ व क्षेत्रिय अधिकारी मजहर खान
मो.नंबर-९०२८९८१५१६
या क्रमांकावर आपण संपर्क साधून वंचितांसाठीचे आपले दिपदान दयावे.

हे दीपदान देतांना दात्याने आपले नाव,जन्मदिनांक मोबाईल क्रमांक,आपला संपूर्ण पत्ता,विद्यार्थी असाल तर संपुर्ण नाव,शाळेचे नाव,इयत्ता,तुकडी असा तपशील असलेली चिठ्ठी जरूर पाकिटात टाकावी.हे प्रकाशदान दीपदान स्वीकारण्यासाठी आम्ही आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत असे आवाहन स्नेहालय’चे जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!