जवळ्याच्या विकासासाठी सरसावले आमदार रोहित पवार जनजीवन मिशन योजनेंतर्गत १९.६६ कोटींच्या नळ पाणीपुरवठ्याला मान्यता

0
185

जामखेड न्युज——

जलजीवन मिशन योजनेंतर्गत जवळा येथील १९.६६ कोटींच्या नळ पाणीपुरवठा योजनेला आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मिळाली प्रशासकीय मान्यता

 जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आलेल्या कर्जत-जामखेड तालुक्यातील १७७ गावांसाठी तब्बल २५५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून ५५ गावांमध्ये प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. नुकतीच जामखेड तालुक्यातील जवळा येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत १९.६६ कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेला शासनाची मंजुरी मिळाली आहे. यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.  

जवळा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची मोठी अडचण होती. ती सोडवण्यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्नशील होते. अशातच जल जीवन मिशन योजनेत समाविष्ट असलेल्या व यापूर्वीच तांत्रिक मान्यता मिळालेल्या जवळा गावातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. एकूण १९.६६ कोटी रुपयांची ही योजना असून दरडोई ५५ लिटर/ प्रतिदिन पाणी या माध्यमातून मिळणार आहे. त्यानुसार आता परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली गैरसोय या माध्यमातून दूर झाली आहे. 

कर्जत व जामखेड तालुक्यातील जास्तीत जास्त गावांचा जलजीवन योजनेत समावेश व्हावा यासाठी रोहित पवार हे प्रयत्नशील होते. राज्य स्तरावर त्यांनी वेळोवेळी संबधित मंत्र्यांना व शासकीय अधिकाऱ्यांना भेटून सर्व गावांचा समावेश जलजीवन योजनेत करून घेतला आहे. तसेच खर्डासारख्या मोठ्या गावालाही त्यांनी यापूर्वी १७.६ कोटी रुपयांचा निधी तर मिरजगावसाठी २२.८५ कोटी आणि कोंभळीसह १२ गावांसाठी ३२ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे.  जलजीवन मिशन योजनेत गावांचा समावेश करण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर डीपीआर तयार करून तेही आमदार रोहित पवार यांनी मान्य करून घेतले आहेत. यासोबतच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवताना प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून हे काम मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले आणि त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून सध्या कर्जत व जामखेड तालुक्यात पाहायला मिळत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here