जामखेड न्युज——
जामखेडच्या अपक्ष उमेदवार निशा कदम यांचा गुरुमाऊली मंडळ 2015 आघाडीला पाठिंबा!!!
जामखेड- शिक्षक बँकेच्या निवडणुकीतील जामखेड तालुक्यातील उमेदवार श्रीमती निशा कदम यांनी श्री बापूसाहेब तांबे व राजकुमार साळवे यांचे नेतृत्वाखाली गुरुमाऊली मंडळ 2015 आघाडीला उमेदवारी मागे घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.
श्री बापूसाहेब तांबे यांचे नेतृत्वाखाली बँकेतील सभासद हिताच्या कारभारामुळे आणि गुरुमाऊली मंडळ आघाडीचा विजय हा निश्चित असल्यामुळे, पुढील पाच वर्ष सभासद हिताचा बँकेचा कारभार होईल, यावर माझा विश्वास आहे .कर्जाचा कमी झालेला व्याजदर.. लाभांश व कायम ठेवीवर वाढते व्याज.. असा कारभार यापूर्वी कोणत्याही मंडळाने केला नाही. मी निवडणुकीतून माघार घेऊन गुरुमाऊलीला पाठिंबा देत आहे. कृपया जिल्ह्यातील मतदारांनी मला मतदान न करता आघाडीच्या छत्रीच्या सर्व उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन केले.
यावेळी किसन वराट, संघाचे तालुकाध्यक्ष दादा चव्हाण, गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मोहोळकर, बँकेचे उमेदवार संतोष राऊत, विकास मंडळाचे उमेदवार मुकुंद सातपुते, विकास बगाडे, मोहन खवळे, जालिंदर भोगल आदी उपस्थित होते.