आयुष्य घडवण्यासाठी वाचनाचा छंद जोपासावा – प्राचार्य डॉ. डोंगरे जामखेड महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

0
143

जामखेड न्युज——

आयुष्य घडवण्यासाठी वाचनाचा छंद जोपासावा – प्राचार्य डॉ. डोंगरे जामखेड महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

“सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आपल्या अभ्यास आणि क्षमतेच्या बळावर भारताला महासत्ता बनण्यासाठीचे स्वप्न देतो आणि जगाच्या इतिहासात अजरामर होतो. ही फक्त कथा नसून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणजे सच्चा प्रेरणास्रोत आहेत. विद्यार्थी जीवनात आपल्या अभ्यासाला जीद्दीने यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी वाचनाचा छंद जोपासून शाश्वत आनंद शोधावा” असे आवाहन प्राचार्य डोंगरे यांनी केले. जामखेड महाविद्यालयात आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषणावेळी ते बोलत होते.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ आक्टोबर हा जयंती दिवस देशभर ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जामखेड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन.सी.सी. विभाग, व IQAC यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके यांनी मार्गदर्शन केले. “जगातील प्रत्येक यशस्वी माणसाच्या यशाचे मुख्य कारण त्याने वाचलेली पुस्तके आणि समजून घेतलेली माणसे असतात. तंत्रज्ञानाच्या युगात आपण समाज म्हणून वाचन चिंतनापासून दूर तर निघालेलो नाहीत ना ? याचा विचार गांभीर्याने करून समाजसुधारक आणि शिक्षणमहर्षी यांनी शिक्षणाची कवाडे उघडण्यासाठी केलेल्या धडपडीची जाणिव नव्याने करून घ्यावी” असा आशावाद डॉ. नरके यांनी व्यक्त केला. यावेळी विचारमंचावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. अविनाश फलके, ग्रंथपाल प्रा. संजय माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. नामदेव प्रा.डॉ. गाडेकर, म्हस्के, प्रा. डॉ. सरवदे, प्रा. डॉ. साळवे, प्रा. काशिद, प्रा.पवार डी.के, प्रा. राळेभात, प्रा. डॉ. गोपाळ जाधव, प्रा. अडाले, प्रा. मिसाळ इत्यादी मान्यवर उपस्थित राहिले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थित सर्वांचे आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. संजय माने यांनी मानले. तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी प्रा. फलके, प्रा.डॉ. म्हस्के, प्रा. डॉ. केळकर प्रा. विशाल रेडे यांनी परिश्रम घेतले.

‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्ताने ग्रंथालय विभागाचे श्री. राजकुमार सदाफुले यांनी संकलित केलेले ‘अहमदनगर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या पराक्रमाची गाथा असणारे ‘ शूरा आम्ही वंदिले’ या वृत्रपत्र कात्रण संकलनाचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. डोंगरे यांनी विशेष कौतुक केले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्रंथालय कामकाजाची ओळख व्हावी आणि वाचनीय पुस्तकांचा परिचय घडावा या उद्देशाने ग्रंथपाल प्रा. माने यांचे पुढाकाराने ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्ताने ग्रंथालय मुक्त संचार उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here