आमदार रोहित पवार कबड्डीच्या मैदानात!!!

0
203

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवार कबड्डीच्या मैदानात

जामखेड तालुक्यातील जवळा येथे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा व नागरी सत्कार संपन्न झाला . यानिमित्ताने आमदार रोहित दादानी कबड्डीच्या मैदानात उतरून खेळाडूंचा उत्साह वाढविला जवळा येथील मुस्लिम बांधव ग्रामपंचायत सदस्य युवा नेते नय्युमभाई शेख व नवयुग कबड्डी क्लब च्या वतीने कबड्डी स्पर्धा व आमदार रोहित पवारांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या कबड्डी स्पर्धेसाठी राज्यभरातून 30 संघांनी हजेरी लावली होती. कबड्डी स्पर्धा चालू असताना मध्ये मध्ये पाऊस येत होता. परंतु पावसाची तमा न बाळगता खेळाडूंनी कबड्डी स्पर्धा चालूच ठेवल्या व संपन्न झाल्या.

व्यायामशाळेची मागणी निकाली 
यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवा नेते नय्युमभाई शेख यांनी आमदार रोहित दादा पवार यांच्याकडे जवळा गावासाठी गावातील युवकांसाठी खुल्या व्यायामशाळेची मागणी केली. यावेळी आमदार रोहित दादांनी पवार यांनी नय्युम भाऊची व जवळेकरांची मागणी पूर्ण केली जाईल सांगितले व डिसेंबरमध्ये कर्जत- जामखेड मध्ये खेळाडूंसाठी खेळांच्या स्पर्धेचे भव्य आयोजन करणार असल्याचे सांगितले.

दादाही उतरले कबड्डीच्या मैदानात यावेळी खेळाडूंनी आमदार रोहित (दादा) पवार यांना कबड्डी खेळण्याचा आग्रह केला व आमदार रोहित( दादा) पवार यांनी कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला

यांनी केले होते आयोजन : युवा नेते ग्रामपंचायत सदस्य युवा नेते नय्युमभाई शेख,, समस्त मुस्लिम बांधव व नवयुग कबड्डी क्लब जवळा यांनी आयोजन केले होते.

यांची होती उपस्थिती :
यावेळी कर्जत- जामखेडचे आमदार रोहित( दादा) पवार, जामखेड पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, राष्ट्रीय सहसमन्वयक आय. काँग्रेस मंगल ताई भुजबळ, उद्योजक रणजीत पाटील, माजी उपसभापती दीपक पाटील, जवळा सोसायटीचे चेअरमन शहाजी (आप्पा) पाटील, पैलवान संकेत( दादा) हजारे , उद्योजक व जवळके गावचे सरपंच सुभाष माने, माजी सरपंच प्रदीप दळवी, युवा उद्योजक अक्षय वाळूंजकर, अशोक पठाडे, राहुल हजारे , उद्योजक तुषार काढणे, अजिंक्य पवार संजय आव्हाड , इरफान पठाण, मुक्तार शेख, उद्योजक सावता हजारे सह जवळा पंचक्रोशीतील तरुणाई मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती.

हे ठरले विजेते :
या कबड्डी स्पर्धेचे पहिले बक्षीस कबड्डी क्लब भूम १५५५५ जिंकले व द्वितीय बक्षीस नवयुग कबड्डी क्लब जवळा यांनी १११११ तसेच तृतीय बक्षीस कबड्डी क्लब आलेगाव ७७७७ व चतुर्थ बक्षीस जामखेड महाविद्यालय यांनी ५५५५ जिंकले. यावेळी आयोजक ग्रामपंचायत सदस्य युवा नेते नय्युमभाई शेख यांनी सांगितले की पुढील वर्षी भव्य अशा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणार आहोत
जवळेकरांनी आमदार रोहित( दादा) पवार यांचा नागरी सत्कार केला. या कबड्डी स्पर्धेचे व आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते रफिक भाई शेख हे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here