श्री.सिध्दिविनायक प्रतिष्ठानच्यावतीने देशमुख परिवाराच्या वतीने विंचरणा नदीचे जलपूजन सुवासिनींच्या हस्ते खणा नारळाने ओटी भरुन साडी चोळी व बांगड्या अर्पण

0
215

जामखेड न्युज——

श्री.सिध्दिविनायक प्रतिष्ठानच्यावतीने देशमुख परिवाराच्या वतीने विंचरणा नदीचे जलपूजन!!! 

सुवासिनींच्या हस्ते खणा नारळाने ओटी भरुन साडी चोळी व बांगड्या अर्पण!!! 

जामखेड शहरात विविध धार्मिक कार्यक्रम व पौरोहित्य करण्यासाठी एक आदर्श परिवार असलेल्या देशमुख परिवाकडून जामखेड शहरालगत असलेली सर्वात मोठी असणारी विंचरणा नदी यावर्षी प्रथमच दुथडी भरुन वाहत असताना

श्री.सिध्दिविनायक प्रतिष्ठानच्यावतीने सुवासिनींच्या हस्ते खणा नारळाने ओटी भरुन साडी चोळी व बांगड्या अर्पण करुन विधीवत जलपुजन करण्यात आले.

यावेळी सिध्दिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश उर्फ सुंदरकाका देशमुख, सचिव सचिन देशमुख, युवक कार्यकर्ते दादा महाडीक, सुहास देशमुख हे उपस्थीत होते.

हा जलपुजनाचा कार्यक्रम सौ.सुषमाताई देशमुख सौ.योगिताताई देशमुख,सौ.पल्लवीताई देशमुख,सौ.मिराताई महाडीक व सौ कल्याणीताई मासाळ या पाच सुवासिनींच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here