झुक झुक आगिन गाडी…….धुरांच्या रेषा हवेत काढी…..रेल्वे प्रवासाची मज्जा. आरणगाव (मळईवस्ती) येथील विद्यार्थ्यांना अनुभवली रेल्वे प्रवासाची अनुभूती

0
232

जामखेड न्युज——

झुक झुक आगिन गाडी…….धुरांच्या रेषा हवेत काढी…..रेल्वे प्रवासाची मज्जा……..

आरणगाव (मळईवस्ती) येथील विद्यार्थ्यांना अनुभवली  रेल्वे प्रवासाची अनुभूती

आज जामखेड तालुक्यातील पहिलीच शाळा की जी रेल्वे नी सहल निघाली दिनांक 07 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरणगाव (मळईवस्ती) येथील विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची अनुभूती तसेच रेल्वे प्रवासाचे मज्जा लुटविण्याचा आनंद देण्यात आला. सदर प्रवासाचा आनंद लुटताना मळईवस्ती शाळेचे विद्यार्थी पालक व शिक्षक.

प्रवासात विद्यार्थ्यांची काळजी घेताना अरणगाव चे सुपुत्र श्री लहू शिंदे. सदर रेल्वे प्रवासाची नियोजन माननीय सरपंच श्री अंकुश शिंदे/लहू शिंदे व उद्योजक माननीय श्री अमोलशेठ निगुडे यांचे तर्फे करण्यात आले होते. या रेल्वे प्रवासात विद्यार्थ्यांना शिक्षकांतर्फे खाऊ वाटप करण्यात आला.


ही अनुभूती देनेसाठी मार्गदर्शन करणारे कर्तव्य दक्ष अधिकारी मा श्री प्रकाश पोळ साहेब व आदरणीय गट शिक्षणधिकारी श्री खैरे साहेब, आमचे प्रेरणस्थान मा. श्री कुंभार साहेब सरपंच श्री अंकुश शिंदे, श्री अमोल नीगुडे,संजय पारे श्री विशाल राऊत ,श्री पोपट शेंडकर,श्री अप्पासाहेब राऊत अध्यक्ष शा. व्य. स. व मळईवस्ती चे सर्व पालक यांचे हार्दिक आभार….

तसेच अंबेश्वर गार्डन,अंभोरा येथे अडवेंचर गेम्स, जॉय राईड, कॅमल राईड, मनोरंजक खेळणी ,रेन डान्स, वॉटर पार्क, D.J. डान्स चा मनोरंजक अनुभव देण्यात आला. मुलांनी या सर्वांचा खूप आनंद घेतला.

विशेष बाब गट विकास अधिकारी साहेब मा.श्री प्रकाश पोळ, गट शिक्षण अधिकारी मा. श्री. कैलास खैरे , केंद्र प्रमुख मा.श्री सुरेश कुंभार यांनी रेल्वेत प्रवास करत असलेल्या मुलांशी व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधला. मुलांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here