जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयातर्फे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन
कोरोना हे संकट कमी झाले असले तरी अजून संपलेले नाही, प्रत्येकाने कोरोना या आजारापासून बचाव करण्यासाठी कमीत कमी तीन डोस घेणे गरजेचे आहे. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव थोडासा कमी झाल्यामुळे कोरोना लसीकरणाकडेही नागरिकांचा वळण्याचा कल बदलला आहे.
हीच गोष्ट ओळखून जामखेड महाविद्यालय, जामखेडने दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते, यामध्ये प्रामुख्याने बूस्टर डोस घेण्याबद्दल जनजागृती तसेच हे डोस महाविद्यालयातच देण्याची सुविधा करण्यात आली होती.
आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून समाजाला कोविड लसीकरणाबद्दल जागृत करणे व लस घेण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे, तसेच ज्या विद्यार्थी व प्राध्यापकांचे बूस्टर डोस घ्यायचे राहिले आहेत त्यांनी आजच बूस्टर डोस घ्यावेत असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील नरके यांनी केले.
जामखेड महाविद्यालय नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी ओळखून समाज उपयोगी विविध उपक्रम राबवत असते आणि अशा उपक्रमामुळे आम्हाला लोकांमध्ये जनजागृती करण्यास व लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते असे मत जामखेड आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले
या लसीकरण शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व प्राध्यापक यांचा समावेश होता तसेच महाविद्यालयातच 30 जणांनी कोविडचा बूस्टर डोस घेतला
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. नरके सर, प्रा.देशमुख, प्रा. अडाले, प्रा.मिसाळ, प्रा. दिंदळे यांनी विशेष परिश्रम घेतले