जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात शेकडो रुग्णांची तपासणी – मोहन पवार
जामखेड मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार आ. रोहित पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळया निमित्त गुरुवार दि .२२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते ०४.०० दरम्यान मोफत आरोग्य तपासणी व आहार विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सर्व प्रकारचे एकुण २१० पेशन्ट तपासून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिबीरार्थींनी समाधान व्यक्त करत आयोजक व डॉक्टरांचे आभार मानले. अशी माहिती शिबिराचे आयोजक नगरसेवक व मातोश्री लाल आखाडा तालीमचे संचालक मोहन पवार (वस्ताद) यांनी दिली आहे.
या शिबीराला आ. रोहित पवार यांनी समक्ष भेट दिली. यावेळी मोहन पवार यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला तर आ. रोहित पवार यांनी उपस्थित शिबीरार्थींचीही आस्थापुर्वक चौकशी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात व माजी सभापती सुर्यकांत मोरे, राजेंद्र गोरे, ताहेर पठाण, लहु पवार, संजीवनी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. पवार, जेष्ठ नेते किसनराव ढवळे हेही आ. पवार यांचे सोबत होते.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आ. रोहित पवार व उपस्थित मान्यवरांच्या प्रतिमा पुजन करून कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले.
या शिबीरात उंची प्रमाणे तुमचे वजन किती असले पाहिजे ? तुमच्या पोटातील अवयवाभोवती किती चरबी आहे ? तुमच्या पुर्ण शरीरात किती टक्के स्नायु आहेत व किती असले पाहिजेत ? मोफत बी.पी. व शुगर तपासणी. वजन वाढवणे किंवा वजन कमी करणे यावर सर्वांसाठी खास उपाय , मार्गदर्शन व शरीरातील चरबीचे विश्लेशन वगैरे तपासण्या व मार्गदर्शन अगदी मोफत करण्यात आले
जामखेड शहरातील तपनेश्वर रोडवरील संजिवनी हॉस्पिटल येथे हे शिबीर संपन्न झाले. शिबिराचे आयोजन जामखेड नगरपरिषदेचे माजी मोहन ( वस्ताद ) पवार ( मातोश्री लाल आखाडा) यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी डाॅ. रविंद्र चव्हाण, आयुर्वेद व आहार तज्ञ, डॉ. मनिषा चव्हाण रेडिओलाॅजिस्ट व आहार तज्ञ, श्रीपती करमाळे, राहुल टेकाळे, ऋतूजा सावंत आहार तज्ञ यांनी शिबीरासाठी विशेष परिश्रम घेतले, या शिबीरात सर्व प्रकारचे एकुण २१० पेशन्ट तपासून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिबीरार्थींनी समाधान व्यक्त करत आयोजक व डॉक्टरांचे आभार मानले.