जामखेड न्युज——
जय श्रीराम शुगर हाळगाव कारखाना दसरा सणाच्या आगोदर उर्वरित पेमेंट करणार – के. एन. निंबे
जय श्रीराम शुगर अॅण्ड अॅग्रो प्रोडक्टस लि. हाळगाव, ता . जामखेड, जि. अहमदनगर मागील गाळप हंगामातील ऊसाचा अंतिम दर २३५३ रू. जाहिर झाला असुन दस-यापुर्वी उर्वरित ५३ रूपयाचे पेमेंट होणार आहे – श्री के. एन. निवे ( व्हाईस प्रेसिडेंट ) जयश्रीराम शुगर यांनी जाहीर केले आहे.
१. मागील गळीत हंगामामध्ये कारखान्याने ३२७०२७ मे. टन गाळप केलेले आहे.
२. मागील गळीत हंगामातील रिकव्हरी = ११.०४%
३ . २०२२-२३ हंगाम दि. २० ऑक्टोवर २०२२ ला सुरू होणार .
४ . वॉयलर प्रदिपन दि. ३० सप्टेंबर २०२२ ला होणार .
५. ऑफ सिझनमध्ये विस्तारीकरण हाती घेतले होते त्याची कामे अंतिम टप्यात आलेली आहेत. विस्तारीकरणामुळे १८00 मे. टनावरून २५०० टनाचे गाळप साध्य होईल .
६ . विस्तारीकरणासाठी कारखान्याचे चेअरमन मा. प्रा. एम. एन. नवले सरांचे बहुमोल मार्गदर्शन
लाभले.
७ . विस्तारीकरणासाठी सर्व पुरवठादार काम करनारे इंजिनिअर्स, कुशल कामगार त्याचप्रमाणे
कारखान्याचे अधिकारी व कामगारांनी उस्फुर्तपणे भाग घेऊन कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी
खुप प्रयत्न केले त्यावद्दल श्री के एन निवे यांनी खुप खुप आभार व्यक्त केले.
८. गळीत हंगाम २०२२-२३ साठी तोडणी वाहतुक यंत्रणा डवल ट्रॉली- ट्रॅक्टर १०१ व सिंगल
ट्रॉली-ट्रॅक्टर ५५ असे एकुण १५६ वाहतुक यंत्रणेचे करार पुर्ण झालेले आहेत .
.
९ . तोडणी करणा-या मजुरांची गावोगावी जाऊन शेती खात्याने माहिती घेतली असुन सर्व तोडणी
करना – या टोळया कामावर येतील अशी ग्वाही मुख्य शेती अधिकारी श्री एम. एम. मोहिते
यांनी दिली. तसेच कारखाना कार्यक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने ऊस पुरवठा
देखील मोठया प्रमाणात राहील असे ते म्हणाले.
१०.कारखाना विनाखंडीत योग्य प्रकारे चालेल अशी ग्वाही कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. व्ही. वी निंबाळकर व वर्क्स मॅनेजर श्री एस. ए. साखरे आणि चिफ केमिस्ट
श्री. एन. डी. चौधरी यांनी दिली.
विस्तारीकरणामध्ये कारखन्याचे चिफ अकौटंट श्री सोमनाथ शिंदे, परचेस अधिकारी
.
११.श्री प्रदिप दंडे, सर्व उपखातेप्रमुख, सर्व इंजिनिअर्स व केमिस्ट तसेच शेती खात्याचा सर्व
स्टाफ यांचे खुप सहकार्य मिळालेचेही श्री निंबे यांनी आवर्जुन उल्लेख केला.
अशा आशयाचे पत्रक (व्ही. बी. निंबाळकर)
जनरल मॅनेजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.