जामखेड न्युज——
नीट परिक्षेत दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल सुमीत वराटचा डॉ भगवानराव मुरुमकर मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, ज्ञानदेव मुरूमकर, डॉ. अजय वराट, महारुद्र नेमाने, दत्तात्रय घोलप, गोकुळ टेकाळे, दिलीप मुरूमकर, नागराज मुरूमकर, प्रतिक मुरूमकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सुमित वराटने नीट परीक्षेत 575 गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले. सुमितने नगर येथे क्लास लावले होते. तसेच कोरोना काळात आॅनलाईन अभ्यास केला.

अभ्यासात सातत्य ठेवून नियमित अभ्यास केला यामुळे यश संपादन झाले असे सांगितले.