जामखेड न्युज——
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे खरे देवदूत त्यांचे कार्य उल्लेखनीय – आमदार रोहित पवार
हजारो लोकांचे प्राण वाचवणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे खरे देवदूत आहेत त्यांनी
माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला कोठारी यांचे कार्य खूप उल्लेखनीय आहे असे मत कर्जत जामखेड आमदार रोहित पवार यांनी मांडले.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन व समर्थ हॉस्पिटल आणि श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी आयोजित भव्य रक्तदान शिबिर १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आले. रक्तदान शिबीराचे उदघाटन गुरुवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता जैन कॉन्फरन्सचे जीवन प्रकाश योजना दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमणलाल लुंकड यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार रोहित पवार यांच्या शुभ हस्ते झाले.यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे ,मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, ॲड. हर्षल डोके,जैन संदेशचे संपादक सुभाषबाबू लुंकड , निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, चार्टट अकौंटंट रवींद्र गादिया , डॉ. भरत दारकुंडे उपस्थित होते. या शिबिरामध्ये ७१ जणांनी रक्तदान केले तर एका महिलेने देहदानचा फॉर्म भरला.

यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले संजय कोठारी यांनी मागच्या वर्षीही माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन अनेक गरजू लोकांचे प्राण वाचवले. मी गेली तीन वर्षापासून पाहत आहे, कोठारी यांचे कार्य खूप उल्लेखनीय आहे अपघातातील लोकांना वाचवण्याचे काम अविरत ते करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांनी आत्ता कोरोना काळामध्ये खूप जणांना वैद्यकीय क्षेत्रात आणि अनेक क्षेत्रात मदत केली.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष भामाशहा रमणलाल लुंकड म्हणाले, मी संजय कोठारी यांचे कार्य ऐकून होतो. परंतु आज प्रत्यक्षात पाहिले आणि ऐकले सुद्धा खरोखर आमच्या जैन कॉन्फरन्स मध्ये कोठारी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
यावेळी बोलताना कॅप्टन लक्ष्मण भोरे म्हणाले, संजय कोठारी यांच्या मुळे आत्तापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. मी गेली दहा वर्षांपासून त्यांचे कार्य पाहत आहे. खरोखर असे कार्य कोणी करत नाही.
हा कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल सोळंकी यांनी केले. ते म्हणाले, कोरोना काळामध्ये गरजूंना किराणा दिला. त्यांनी मुक्या प्राण्यांना चारा दिला. तर कुत्र्यांना चपात्या दिल्या. तसेच अनेक पायी चालणाऱ्या प्रवाशांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली त्यांचे कार्य खूप महान आहे.
परमपूज्य चंदनबालाजी म.सा. आणि परमपूज्य पद्मावतीजी म.सा. यांच्या अज्ञानुपुर्ती परमपूज्य
चारूप्रज्ञाजी म. सा. आणि परमपूज्य वितरागवंदनाजी म.सा. आदि ठाणा ६ च्या उपस्थितीमध्ये झाला.
कोरोनामध्ये लोकांना रक्ताचे महत्व कळले आहे. रक्ताचा तुटवडा होत आहे. त्यामुळे रक्तदान सारखे शिबिर घेणे गरजेचे आहे. रक्तदान केल्याने अपघातातील लोकांचे प्राण वाचण्यास मदत होइल असे संजय कोठारी यांनी सांगितले.
कोठारी प्रतिष्ठान मार्फत २६ वेळा रक्तदान शिबिर घेण्यात आलेले आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांनी आजपर्यंत अपघातातील अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत . सध्या कोरोना मुळे रक्ताची कमतरता भासत आहे. प्रत्येकाने रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी हातभार लागणार आहे असे कोठारी म्हणाले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले तर आभार रोहन कोठारी यांनी मानले .
महावीर भवनमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीरास प्रफुल्ल सोळंकी,विजय डोंगरे (सचिव जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर), प्रवीण शीलवंत दिपक भोरे, सचिन गाडे,राजेश गांधी, दीपक लुणावत,सुर्यकांत नाना मोरे, सुनील कोठारी, विजय कोठारी, अमृतलाल कोठारी, उमरभाई कुरेशी, प्रकाश काळे, अमोल लोहकरे, दत्ता साळुंखे,बबन काका काशीद,राजेंद्र गोरे,शरद शिंदे, संजय बोरा, सुमित चानोदिया, प्रा.राहुल आहिरे सर,दिपक पाटील, ईस्माइल सय्यद, प्रवीण उगले, मोहन पवार, विकीभाऊ सदाफुले,अभय शिंगवी,मनोज भोरे उपस्थित होते.




