जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज———-अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार -महादेव वराट
जामखेड साकत राज्य मार्गावरील दिशादर्शक फलक गायब आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही त्यामुळे सहा महिन्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेकांचे हात पाय मोडले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने ताबडतोब दिशादर्शक फलक लावावेत तसेच रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा साकत ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट यांनी बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.

करमाळा साकत मार्गे पाटोदा राज्य मार्ग क्रमांक ५६ वरील साकत जामखेड रस्त्यावरील दिशादर्शक फलक चारच महिन्यात गायब झाले आहेत. यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक वेळी फलक बसवल्यावर चार ते पाच महिन्यातच ते गायब होतात याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. फलक नसल्याने अनेक अपघात होतात श्री साकेश्वर गोशाळा तसेच घाटात अनेक अपघात झाले आहेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांचा हात पाय मोडला आहे यामुळे ताबडतोब दिशादर्शक फलक लावावेत तसेच रस्त्यावरील फांद्या तोडाव्यात असे निवेदनात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून सावरगाव वस्ती ते साकत पर्यंत सात किलोमीटर रस्ता तयार झाला या रस्त्यावर अनेक ठिकाणी घाट व वळण असलेल्या ठिकाणी जवळपास पंचवीस दिशादर्शक फलक बसवले होते. चारच महिन्यात यातील वीस फलक गायब झाले आहेत. नवीन रस्ता झाला की त्या रस्त्यावर दिशादर्शक फलक बसवतात व तिन चार महिन्यांतच ते गायब होतात नेमके या फलकाची चोरी होते की बसवणारेच लोक ते काढून नेतात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

नविन रस्ता झाला की दिशादर्शक फलक बसवतात आणी चार सहा महिन्यात ते गायब होतात मागेही चार सहा महिन्यातच हे दिशादर्शक फलक गायब झाले होते. आताही गायब झाले आहेत.
दिशादर्शक फलकांमुळे कोठे वळण हे रेडियम मुळे रात्री लक्षात येते. यामुळे वाहने व्यवस्थित चालवता येतात. अपघात होत नाहीत पण आता हेच दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. नेमके प्रत्येक वेळी हे फलक गायब कसे होतात याची बांधकाम विभागाने सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच बांधकाम विभागाने ताबडतोब दिशादर्शक फलक लावावेत तसेच रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा साकत ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट यांनी बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.




