Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी माध्यमिक शिक्षण विभागासमोर शिक्षकांचे धरणे आंदोलन शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी माध्यमिक शिक्षण विभागासमोर शिक्षकांचे धरणे आंदोलन शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार

0
263

जामखेड न्युज——

 

जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातील विविध प्रलंबित
प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने यासंदर्भात खुलासा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षण विभागासमोर शुक्रवारी (दि. २) धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याने संतप्त आंदोलक शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीस फुलांचा हार घालून गांधीगिरी केली,जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून, अनेक वेळा भेटून चर्चा करूनही प्रश्नासंदर्भात निपटारा झाला नाही.

या सर्व शिक्षक-शिक्षकेतरांचे प्रश्नांसाठी माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस अप्पासाहेब शिंदे,फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष चांगदेव कडू, माजी जिल्हाध्यक्ष एम. एस. लगड, विजय थोरात, हरिचंद्र नलगे, राजेंद्र खेडकर, आत्माराम दहिफळे, महेंद्र हिंगे, प्रशांत होन, बद्रीनाथ शिंदे, दिलीप ढवळे, सुधीर काळे, एन. जी. देशमाने, देवीदास पालवे, नंदकुमार शितोळे जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. टी. गायकवाड, सचिव रमेश बोलभट, त्याचबरोबर जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी रमेश अडसूळ, सुर्यकांत कदम, भरत लहाने, आणि राजेंद्र पवार हे सर्व सक्रिय सदस्य उपस्थित होते

जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते अनेक मान्यवरांनी शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये होत असलेला भ्रष्टाचार मेडिकल बिले मधील भ्रष्टाचार त्याचबरोबर पुरवणी वेळ बीलेमधील भ्रष्टाचार तसेच ज्या सेवकांनी पैसे दिले त्यांचे काम अगोदर व ज्या सेवकांचे पैसे दिले नाहीत त्यांचे काम होत नाही या अनेक बाबीवर आक्षेप घेऊन जोरदार ताशेरे ओढण्यात आले शेवटी शिक्षणाधिकारी यांनी कार्यालय बाहेर जाऊन आपला मोबाईल स्विच ऑफ केला त्याप्रसंगी सर्वांनी शिक्षणाधिकारी खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला

चौकट
शिक्षण विभागात सावळा गोंधळ आहे. भविष्य निर्वाह निधी, एनपीएस, डिसीपीएस बाबत एकवाक्यता नाही. अनेक शिक्षकांचे तिन्ही अकाउंट आहेत. तिन्ही ठिकाणी पैसे आहेत. वेतन पथक अधीक्षकांनी मनमानी पद्धतीने अनेकांचे भविष्य निर्वाह निधी खाते बंद करून एनपीएस सुरू केले परत भविष्य निर्वाह निधी काही जणांचे सुरू आहेत. एकवाक्यता हवी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!