वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप         सदाफले कुटुंबीयाचा वेगळा आदर्श

0
169
जामखेड न्युज——
वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतवडा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर वेगळाच आनंद दिसून आला तर सदाफले कुटुंबीयांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 
                  कै.दत्तात्रय लक्ष्मण सदाफुले यांचे गेल्यावर्षी कोरोनामुळे दुःखद निधन झाले.वडिलांच्या असं अचानक जाण्यामुळे पूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं. पण त्यांची मुलं खचून न जाता वडिलांनी घालून दिलेला वारसा अगदी प्रामाणिकपणे पुढे चालवत आहेत. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की माझी मुलं खूप शिकावी सरकारी नोकरीमध्ये प्रामाणिकपणे सेवा करावी.
पण हे सर्व अर्धवट राहिल्यामुळे कै. दत्तात्रय लक्ष्मण सदाफुले यांच्या मुलांनी वडिलांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतवडा येथील सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. यावेळी त्यांचे नातेवाईक श्री अमित पवार, कै.दत्तात्रय लक्ष्मण सदाफुले यांचा छोटा मुलगा तन्मय सदाफुले, वेदांत सदाफुले, तुषार सदाफुले, किरण सदाफुले इ. उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर वेगळाच आनंद दिसून आला.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here