Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या जीवन साई हाॅस्पीटल मध्ये ८५ वर्षाच्या वृद्धावर सांधेरोपन ( खुब्याची) यशस्वी शस्त्रक्रिया

जीवन साई हाॅस्पीटल मध्ये ८५ वर्षाच्या वृद्धावर सांधेरोपन ( खुब्याची) यशस्वी शस्त्रक्रिया

0
234
जामखेड न्युज——
  
   
    जामखेड शहरातील महाराष्ट्र बँके शेजारी जीवनसाई हाँस्पिटल येथे तालुक्यातील पिंपळगाव येथील ग्रामस्थ जैनूद्दीन शेख वय (८५) हे अपघातात जखमी झाल्यामुळे 
सांधेदुखी आजाराने ( खुबा) त्रस्त होते.
त्यांच्या वर जीवनसाई हाँस्पिटल येथे डाँ राहुल पंडीत अर्थो यांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे या वृद्धाला अस्थमा आजार होता तरीही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.   
        यासाठी भुलतज्ञ डाँ. अंकुश पवार यांनी चोख भुमिका बजावली. तसेच या शस्त्रक्रियेसाठी विशेष सहकार्य कौशल्या लँबचे संचालक गोकुळ कोल्हे, श्रीकांत कांबळे, समीर शेख यांनी केले.
     
       याप्रसंगी जीवनसाई हाँस्पिटलला ग्रामीण रुग्णालयचे  नवनिर्वाचित वैद्यकीय अधिक्षक डाँ. शशांक वाघमारे यांनी भेट दिली. हांँस्पिटलचे संचालक डाँ. भरत देवकर,डाँ. सादेख पठाण यांनी त्यांचा सत्कार केला.
    यावेळी बोलताना जीवन साई हाॅस्पीटलचे संचालक डॉ. सादेक पठाण म्हणाले की, आमच्या हाॅस्पीटलमध्ये ८५ वर्षाच्या वृद्धावर सांधा बदल शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हाडाचे डॉक्टर राहुल पंडीत व राऊत यांनी अस्थमा आजार असतानाही यशस्वी शस्त्रक्रिया केली. 
    आमच्या हाॅस्पीटलमध्ये अर्थो सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वी होतात. आम्ही मुळव्याध च्या १५० पेक्षा जास्त किचकट शस्त्रक्रिया केल्या आहेत. 
आम्ही पुढील महिन्यात गुडघा वाटी सरकणे, दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया शिबीर घेणार आहोत. यासाठी माफक दरात म्हणजे फक्त ४० टक्के दरात शस्त्रक्रिया करणार आहोत. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हाॅस्पीटलच्या वतीने संचालक डॉ. सादेक पठाण यांनी केले आहे. 
     डॉ. राहुल पंडित अर्थोपीडीक सर्जन  यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, सात दिवसांपूर्वी शेख वय ८५ यांचा अपघात झाला होता मांडीला जखम झाली होती. खुब्याचे तुकडे झाले होते. आम्ही खुबा बदली शस्त्रक्रिया यशस्वी केली. यासाठी डॉ. सादेक पठाण व डॉ. भरत देवकर यांचे सहकार्य लाभले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!