LOC भारत पाक बॉर्डरच्या राजाची मूर्ती जम्मू आणि काश्मीर येथे रवाना मोठ्या भक्ति भावात साजरा होणार गणेशोत्सव

0
229

 

जामखेड न्युज——

ता. २१,घाटकोपर (मुंबई उपनगर )

 

“गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया भारत पाक बॉर्डरच्या राजाचा विजयी असो”संपूर्ण देशासह महाराष्ट्रात तसेच मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत कुर्ला नेव्ही गेट येथील सिद्धिविनायक चित्र शाळेत दिव्यांग मूर्तिकार विक्रांत पांढरे यांनी साकारलेली LOC भारत पाक राजाची सुबक आणि सुंदर मूर्ती मुंबईहून शिवनेरी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष छत्रपती दादा आवटे व मानव अधिकार कार्यकर्त्या व प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदिर ट्रस्ट उपाध्यक्षा ईशर दीदी ह्या स्वराज एक्स्प्रेसने जम्मू आणि काश्मीर येथील पुछं या ठिकाणी गणरायाची मूर्ती रविवारी पाठवली.

त्यावेळी प्रोग्रेसिव्ह नेशनचे प्रभाकर चव्हाण, मंगेश मस्तूद, बाळू राऊत, सिद्धार्थ बाधरकर, प्रमोद महाडिक, अवधूत दळवी, उमेश पास्टे,अतुल चौधरी उपस्थित होते. 

 

मागील दोन वर्षांपासून मुंबईसह देशात कोरोनाचे सावट असल्याने प्रत्येक सणावर निर्बंध असल्याने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला नाही. पण या वर्षी गणेशोत्सवरील निर्बंध हटविण्यात आले आहे. ही सर्व गणेश भक्तांसाठी आनंदाची बाब आहे.

या वर्षी हे LOC भारत पाक बॉर्डरच्या राजाचे १२ वे वर्ष आहे. म्हणजे एक तप पूर्ण झाले आहे.या वर्षी आपण स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले आहे. त्यामध्ये आपल्या सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानाचे देखील महत्वाचे योगदान आहेत. ऊन, पाऊस, वारा, याची तमा न बाळगता जिद्दीने आपल्या देशाचे रक्षण करत आहेत. म्हणून आपण सुरक्षित आहोत.

 

भारतीय जवानांना देखील गणेशोत्सव साजरा करता यावा. या उद्देशाने मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. आणि मुंबई मध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे मुंबईतून सर्वाचे प्रेम आशिर्वाद घेऊन मानव अधिकार कार्यकर्त्या व प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट उपाध्यक्षा ईशर दीदी जम्मू आणि काश्मीर येथील पुछं या ठिकाणी घेऊन जातात जम्मू काश्मीर येथे भारतीय जवान मोठ्या हर्ष उल्हासात गणरायाचे स्वागत करतात व जम्मू आणि काश्मीर येथील पुछं या ठिकाणी गणरायाला विराजमान करतात. आणि त्या ठिकाणी आपले भारतीय जवान दहा दिवस भक्ति भावाने गणरायाची पूजा अर्चा केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here