जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कामिनीताई राजगुरू यांची निवड

0
251
जामखेड प्रतिनिधी 
 जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शिक्षक संघ सदिच्छा मंडळाच्या महिलांचा शिक्षिका मेळावा सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
     या मेळाव्यात जामखेड तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा पदी धडाडीच्या कर्तृत्वान व नेतृत्वगुण असणाऱ्या तथा शिक्षकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पदवीधर शिक्षिका श्रीम.कामिनीताई राजगुरू अंधारे  यांची एकमताने निवड करण्यात आली.
        यावेळी बहुसंख्य महिला शिक्षिकांनी मनोगते व्यक्त केली.स्त्री म्हणून जीवनात वाट्याला येणार संघर्ष, नोकरी, संसार अशा अनेक भूमिका बजावत कुटुंबात आनंद निर्माण करणारी शक्ती म्हणजे स्त्री.
       यावेळी उपस्थित सर्वच महिला शिक्षिकांचे महिला आघाडीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात  आले.
    त्याचप्रमाणे तालुक्यात नव्याने रुजू झालेल्या इंगळे मॅडम व साळी यांचे स्वागत करुन  सत्कार करण्यात आला.
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षिका शैलजा बडे, मेळाव्याचे प्रास्ताविक अर्चना भोसले यांनी तर सूत्रसंचालन  मंजिरी गाढवे यांनी केले.
     यावेळी सुलभा पुंडे, जयश्री पाटील जाधव, तबसूम बागवान, चंद्रकला खरपुडे शिंदे, मंजुषा सोले घोलप,  मंगल गर्जे, सिंधू अंधारे राजगुरू, जयश्री दळवी कांबळे, कल्पना साबळे राऊत, दिपाली गडकर राऊत, सारिका पोले कोळेकर, सय्यद, तेजस्विनी मासाळकर ,बागवान, मंगल गर्जे, रेखा साळे, सुमन आल्मले,  सारीका इंगळे यांच्यासह अनेक महिला शिक्षिका उपस्थित होत्या.
   तसेच या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, शिक्षक संघाचे नेते संतोष हापटे, केशवराज कोल्हे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष संतोष भोंडवे, ज्ञानेश्वर कोळेकर, नितीन मोहोळकर, नितीन जाधव, शाकिर शेख, शकील बागवान, मारुती गीते यांच्यासह अनेक शिक्षकांनी उपस्थित राहून महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
     यावेळी बोलताना नवनियुक्त महिला आघाडी च्या अध्यक्षा कामिनीताई राजगुरू यांनी महिलांचे प्रश्न,अडचणी सोडण्याबरोबर दरमहिन्याला मिटिंग आयोजित करून केलेल्या कामाचा आढावा घेणार असल्याचे सांगत ही केलेली निवड सार्थ करून दाखवणार असे ठामपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here