जामखेड न्युज——
तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कोल्हेवाडी येथे गोवर्धन आबा कोल्हे व रामदास सोनबा कोल्हे यांचे बंद घराचे कुलुप तोडून घरातील साठ हजार रुपये व साडेतीन तोळे सोने लंपास केले आहे.यामुळे साकत परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गोवर्धन कोल्हे यांच्या सुनेला जामखेड येथे एका खाजगी दवाखान्यात दाखल केल्यामुळे सकाळीच घराला कुलूप लावून घरातील सर्व जण जामखेडला गेले होते. याच संधीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील कपाटात ठेवलेले अडिच तोळे सोने लंपास केले सुदैवाने काही रोकड व सोने राहिले.

दुसऱ्या घटनेत रामदास सोनबा कोल्हे यांचे बंद घराचे कुलुप तोडून घरातील साठ हजार रुपये रोख व एक तोळे सोने लंपास केले आहे. सायंकाळी घरी आल्यावर ही घटना लक्षात आली.

दोन्ही घटनेत साठ हजार रुपये रोख व साडेतीन तोळे सोने लंपास झाले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय लाटे, पोलीस काॅन्टेबल संदीप आजबे, सचिन पिरगळ, विजय कोळी, अजय साठे पथक घटनास्थळी दाखल झाले व तपासाला सुरूवात केली आहे.
गुन्हा दाखल करण्याचे काम जामखेड पोलीस स्टेशनला सुरू आहे.