आयुष्यातील अडथळ्यांची शर्यत पूर्ण करणारा आष्टीचा अविनाश साबळे

0
220
जामखेड न्युज——
 महाराष्ट्राच्या (Maharashtra) अविनाश साबळे (Avinash Sable) यानं बर्मिंगहॅममधल्या (Birmingham) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) नवा इतिहास घडवला. त्यानं तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या स्टीपलचेस शर्यतीत भारताचं हे आजवरचं पहिलं पदक ठरलं. या शर्यतीत अविनाश साबळेनं आठ मिनिटं 11.20 सेकंदांची वेळ दिली. त्याचा हा आजवरचा नववा राष्ट्रीय विक्रम ठरला. अविनाशनं रबात डायमंड लीगमधला आठ मिनिटं 12.48 सेकंदांचा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम आज मोडीत काढला. अविनाश साबळे हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातला आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो भारतीय सेनेत दाखल झाला आहे. 
बीडचा (Beed) धावपटू अविनाश साबळे यानं आपली आंतरराष्ट्रीय स्तरावरील चुणूक पुन्हा दाखविली. अमेरिकेतील सन जुआन येथे झालेल्या राउंड रनिंगमध्ये त्यानं तीस वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला होता. बीडच्या अविनाश साबळे यानं कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकून एक नवा करिष्मा करून दाखवला आहे. 3000 मीटर स्टीफलचेस शर्यतीचा अंतिम फेरीत अविनाश साबळे आणि केनियाच्या खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर झाली. याच खेळाडूंना टफ फाईट देऊन अविनाशनं 8:11:20 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकून नवा इतिहास घडवला आहे. आष्टी सारख्या छोट्याशा गावात जन्माला आलेल्या मांडवा गावच्या तरूणानं सातासमुद्रापलीकडे आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अभिमानाची बाब आहे. 
अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सर्वामुळे 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांना पहिला नंबर पटकावला होता. 
अविनाश आता धावण्याच्या स्पर्धेमध्ये यशाचं एक-एक शिखर सर करतोय आणि त्यासाठी त्याला त्याच्या कुटुंबाची देखील मोलाची साथ मिळाली आहे. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी आणि सरावासाठी वेळप्रसंगी व्याजानं पैसे काढले आणि त्याचे शिक्षण आणि सराव चालू ठेवला. लष्करामध्ये अविनाशला नोकरी लागली, तरीही त्यातला खेळाडू शांत बसाला नाही, त्यानं आपली जिद्द सोडली नाही. 
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अविनाशला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी, स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. त्यानं केलेल्या या नव्या विक्रमामुळे आता अविनाशला आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 हजार मीटर स्टीपलचेस आणि 5 हजार मीटर या दोन्ही प्रकारांत उतरवण्याची तयारी सुरु आहे. 
अविनाशनं अमेरिकेत नुकताच धावण्याचा एक रेकॉर्ड देखील मोडीत काढला आहे. सॅन जुआन कॅपिस्टानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटरमध्ये 5 हजार मीटर शर्यतीत धावून धावपटू बहादूर प्रसाद यानं केलेला 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here