जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने मोफत ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न

0
256
जामखेड प्रतिनिधी
            जामखेड न्युज——
धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने मोफत ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा शनिवारी सुपा ता. पारनेर जि. नगर येथे संपन्न झाला. या ॲम्ब्युलन्सचा उपयोग गरजू रुग्णांना होणार आहे. रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे यातूनच हा उपक्रम राबविण्यात आला आहे. 
अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज तसेच परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या आपत्कालीन मदत उपक्रमाअंतर्गत मोफत ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळाशनिवार दि.06/08/2022 रोजी सकाळी 11.00वा.सुपा (टोल नाका) ता. पारनेर जि. अहमदनगर येथे संपन्न झाला…..
      प्रथमत: जगद्गुरू श्रींच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर ॲम्ब्युलन्सचे पुजन केले व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. श्री नितीनकुमार गोकावे (पोलीस निरीक्षक सुपा) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले …..
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते,       
1.श्री शशिकांत गिरी साहेब(API महामार्ग पोलीस केंद्र केडगाव)
  2. श्री शेंडे साहेब(हवालदार महामार्ग पोलीस केंद्र केडगाव)
3. श्री नारखडे साहेब (सिनिअर मॅनेजर सुपा टोल प्लाझा)
4. श्री शंकर जानवा (अकाऊंट मॅनेजर सुपा टोल प्लाझा)
5. ) श्री अंजना साहेब (देखरेख अधिकारी सुपा टोल प्लाझा) त्याचप्रमाणे स्व स्वरूप संप्रदायातील खालील पदाधिकारी उपस्थीत होते 
1.सौ. अलकाताई खर्डे (उत्तर महाराष्ट्र पीठ महिला निरीक्षक)
2.श्री दत्तात्रय उन्हाळे साहेब (जिल्हा निरीक्षक उत्तर नगर)
 3. श्री प्रशांत जोशी साहेब (जिल्हा निरीक्षक दक्षिण नगर)
4. श्री अनंता सोट (जिल्हा अध्यक्ष दक्षिण नगर)
5.सौ छायाताई ठाकरे (जिल्हा महिला अध्यक्षा)
6. श्री कैलास भिसे साहेब (जिल्हा कर्नल)
7. श्री गणेश जगदाळे साहेब (जिल्हा युवा प्रमुख)
8.श्री. शिवाजी माने साहेब (जिल्हा आध्यात्मिक प्रमुख)
9.आशाताई गायकवाड (जिल्हा संजिवनी प्रमुख)
10. भाग्यश्रीताई निकम (जिल्हा देणगी प्रमुख)
11. श्री राहुल काळे (जिल्हा शिबिर प्रमुख)
12. श्री सागर आढाव (श्रीगोंदा तालुका अध्यक्ष)
13. श्री दिलीप रासकर (ॲम्बुलन्स दक्षता अधिकारी)
           त्याचप्रमाणे जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी,भक्त, शिष्य ,साधक ,हितचिंतक उपस्थित होते.
               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश जगदाळे यांनी केले, प्रास्ताविक जिल्हा निरीक्षक श्री जोशी साहेब यांनी केले.
     सौ खर्डे ताई व श्री उन्हाळे साहेब यांनी संस्थानाच्या सर्व उपक्रमाविषयी* माहिती दिली.
    श्री गिरी साहेब यांनी संस्थानाच्या उपक्रमाचे कौतुक केले. 
         पारनेर तालुका अध्यक्ष श्री भाऊसाहेब शिंदे साहेब यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here