जामखेड न्युज——
कुस्ती क्षेत्रात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २०१८ साली सुवर्णपदक पटकावणारा राहुल आवारे तसेच कुस्तीतील चमकता तारा गोकुळ आवारे हे मुळचे जामखेड तालुक्यातील माळेवाडी येथिल कुटुंब आहे. वडील बाळासाहेब आवारे यांनी अत्यंत गरीबीतुन दोन्ही मुलांना घडविले. मुलांच्या भवितव्यासाठी पाटोदा येथे राहण्यासाठी आले. तर महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख यांचे कुटुंबीय जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील आहेत. पोट भरण्यासाठी हे कुटुंब खडकी ता. करमाळा जि. सोलापूर येथे स्थाईक झाले.

जामखेड न्युजने राहुल व गोकुळ आवारे यांचे पिताश्री बाळासाहेब आवारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही मुळचे माळेवाडी ता. जामखेड येथील मुलांच्या भवितव्यासाठी माळेवाडी सोडून पाटोदा येथे स्थायिक झालोत. राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाइलमध्ये बाँझपदक पटकावले. ब्राँझपदक जिंकणारा राहुल हा महाराष्ट्राचा पहिलाच मराठमोळा. एकूण भारताचा तिसरा मल्ल. त्याआधी महाराष्ट्राच्या नरसिंग यादवने २०१५ तर संदीप यादवने २०१३मध्ये पदक पटकावले. लहानपणी राहुल हा उनाडक्या करणारा आणि वर्गात दंगेखोर. त्याच्या तापट स्वभावामुळे वडील बाळासाहेब यांनी त्याला कुस्तीकडे वळविले. एक तापट मुलगा ते एक चांगला मल्ल आहे. माती व देशासाठी खेळणाऱ्या राहुलने आजवर जागतिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत पदक जिंकले आहे. राहुलने २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर २००९ व २०११ च्या आशियाई स्पर्धेत तो ब्राँझ पदकाचा मानकरी ठरला. राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने पाचवेळा सुवर्णपदक जिंकले. जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाइल खेळणाऱ्या राहुलने मराठी पताका फडकविली. राहुलच्या पराक्रमाने सारे कुस्तीप्रेमी खूष आहेत. रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार हे त्याचे गुरू तर सध्या विख्यात मल्ल काका पवार यांच्याकडे तो नवनवीन डाव शिकत आहे. हे ब्राँझपदकही राहुलने हरिश्चंद्र बिराजदार यांनाच समर्पित केले आहे.

राहुलला ‘लक्ष्य ऑलम्पिक’ या योजनेत क्रीडा खात्याची आर्थिक मदत मिळाली आहे. हे वर्ष राहुलसाठी खूप चांगले व यशस्वी चालले आहे. इटली व चीनच्या स्पर्धांमध्ये त्याने ब्राँझपदक तर तुर्कीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धांमुळेच त्याला या स्पर्धेत पदक जिंकण्याची ऊर्जा मिळाली आहे. जागतिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन देशासाठी पदक जिंकण्याची त्याची मनीषा आहे. देशाबरोबरच मराठवाडा आणि महाराष्ट्राचे नावही राहुलने उज्ज्वल केले आहे.
बाळासाहेब आवारे हेही चांगले पैलवान होते. परिसरातील यात्रेत अनेक हगामे बाबासाहेबांनी गाजवलेले आहेत.
महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख यांचे वडील आदम शेख वय ६१ यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, आम्ही सध्या खडकी ता. करमाळा जि. सोलापूर येथे स्थायिक आहोत पण आमचे मूळ गाव हे जामखेड तालुक्यातील धनेगाव आहे. आमच्या आजोबांनी पोट भरण्यासाठी धनेगाव सोडले व खडकीला आहोत आमचा मूळ व्यवसाय शेतीची औजारे तयार करणे हा आहे. कुस्ती क्षेत्रात त्यांचीसातवी पिढी आहे आजोबांना वाराचा लंगोट लागत होता.
आदम शेख म्हणाले की. सध्या आमच्या घरात तीन पैलवान आहेत. घरी तालीम आहे. बालारफिक महाराष्ट्र केसरी झालेला आहे तर पुतण्या समिर शेख महाराष्ट्र केसरी साठी प्रयत्न करत आहे.
बालारफिक ला घडविताना हालाखीच्या परिस्थिती मुळे खूपच त्रास झाला. शाळेत जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून कुस्ती क्षेत्रात उतरविले सुरूवातीलाकोल्हापूरला गणपत आंधळकर यांच्या तालमीत दोन वर्षे पाठवल
नंतर पुणे येथील गणेश दांगट यांच्या तालमीत पाठवले बालारफिकला घडविण्यात माजी आमदार नारायण आबा व आण्णासाहेब पठारे यांचे मोठे सहकार्य लाभले.
बालारफिक शेख तसेच राहुल आवारेने कुस्ती क्षेत्रात वेगवेगळे विक्रम केलेले आहेत दोघांचीही घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. पोटाला चिमठा घेत आदम शेख व बाळासाहेब आवारे यांनी मुलांना घडविले आहे. यांचे मुळ गावे जामखेड तालुक्यातील आहेत. तसेच क्रिकेट क्षेत्रात नावलौकिक मिळवणारा झहिर खान यांचेही मूळ गाव जामखेडच आहे.
तरूणांना संदेश देताना आदम शेख म्हणाले की, गावात तालीम हवीच तसेच घरा घरात पैलवान हवा आहे. शरीर संपत्ती हिच खरी संपत्ती आहे. तरूणांनी कुस्ती क्षेत्रात आपले करिअर घडवावे खुप संधी आहेत.