जामखेड न्युज——
जामखेड शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दोन वर्ष कोरोना काळात जयंती साजरी झाली नव्हती त्यामुळे ह्यावर्षी जयंतीदिनी मोठा उत्साह मातंग समाज बांधवांमध्ये दिसून आला.

शहरातील साठे नगर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील एवन काॅर्नरचे आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे चौक असे नामकरण करण्यात आले.

यावेळी अभिवादनासाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा.मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक मोहन पवार, जेष्ठ नेते दादासाहेब रिटे, वसीम सय्यद, प्रा. कुंडल राळेभात, पवन राळेभात, उल्हास माने, संतोष गव्हाळे, अमोल गिरमे, लखन मिसाळ, माजी उपनगराध्यक्ष शाकीरभाई खान, डाॅ.प्रदीप कात्रजकर प्रा.विकी घायतडक, प्रकाश सदाफुले, अमित जाधव, अतिश पारवे, आजिनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे कार्य महान होते. त्यांनी लिहिलेली फकिरा कादंबरी सर्वांनी वाचली पाहीजे. त्यातच आपल्याला आण्णाभाऊ समजतात..
यावेळी प्रा.मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, ॲड. अरुण जाधव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सायंकाळी ४ वाजता शहरातून आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वीसाठी जयंती उत्सव समीतीचे अध्यक्ष रवी डाडर, उपाध्यक्ष शेखर मोरे, खजिनदार जितेश डाडर, सोनू क्षीरसागर, दादा डाडर, किशोर कांबळे, सागर रिटे, मनोज डाडर, बाळु डाडर, अतिश डाडर, संतोष थोरात, लखन गाडे, कुमार गाडे, करण डोलारे, प्रेम काबंळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी केले तर आभार प्रा.सुरज डाडर यांनी मानले.