जामखेड न्युज——
जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आनंदनगरी मध्ये आकाशी पाळणे, ब्रेक डान्स, मौत का कुआ, टोरा टोरा, पन्नालाल, तिरका पाळणा, रेल्वे, बोट, लहान मुलांचे विविध करमणूकीची साधने, तसेच खवय्यांसाठी पावभाजी, चायनिज, वडापाव, पाणीपुरी, विविध गृहोपयोगी वस्तू, यांचा मेळा बैल बाजार मैदानावर वसलेला आहे यांचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सरांच्या हस्ते झाले.

आनंदनगरीचे उद्घाटन सचिन गायवळ सरांच्या हस्ते झाले यावेळी, मनोज मैंड, वीरराजे गृपचे अध्यक्ष तसेच भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अभिजित राजे राळेभात, समता गृपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तानचे पांडूराजे भोसले, विजय राळेभात, आरपीआयच्या प्रदेशाध्यक्ष शांताबाई लोंढे, कृषा राळेभात, गौरव राळेभात, शिवम घायतडक, तुषार शिरोळे, जमीरभाई सय्यद, भाऊसाहेब शिंदे, तुषार बोथरा, सुरज राळेभात, सचिन देशमुख, भाऊ गोरे, श्रीगोंदा शिवसेना शहराध्यक्ष समीर काझी, दादा लाड, अमोल गव्हाने, वाहेदभाई पठाण, शहाबाज सय्यद यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.

सचिन गायवळ सरांच्या हस्ते नारळ वाढवून आनंदनगरी चे उद्घाटन झाले असे जाहीर करण्यात आले. यावेळी गायवळ सरांनी मित्रमंडळी समवेत आकाशी पाळण्यात बसून आनंद घेतला तसेच पावभाजी चाही आस्वाद घेतला.

यावेळी बोलताना पांडूराजे भोसले व मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे यांनी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या.

जामखेड न्यूजशी सचिन गायवळ म्हणाले की, यात्रेनिमित्त परिसरातून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या व आनंदनगरीचा शांततेत आनंद घेण्याचे आवाहन केले.
अभिजितराजे राळेभात म्हणाले की, भाविक भक्तांच्या सुरक्षिततेची संपुर्ण काळजी प्रशासनाच्या सहकार्याने घेतली जाणार आहे. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जागोजागी मोबाईल टायलेट आहेत. वाहन पार्किंग सुविधा केलेली आहे तेव्हा लहान मुले, महिला व नागरिकांनी आनंदनगरीचा आनंद घ्यावा असे आवाहन जामखेड न्यूजशी बोलताना केले आहे.