जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
राष्ट्रवादी काँग्रेसचा तसेच आमदार रोहित पवारांचा एकनिष्ठ कार्यकर्ता तसेच जनसामान्यांसाठी अहोरात्र झटणारे आमदारांच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी, काँक्रीटीकरण हे प्रश्न मार्गी लागणारे सर्वसामान्य जनतेत भाऊ नावाने परिचित असलेले नितीन (भाऊ) ससाणे यांच्या पत्नी सौ. मीना नितीन ससाणे यांना साकत गटातील शिऊर गणातून उमेदवारी द्यावी अशी मागणी गणातील कार्यकर्ते करत आहेत.
सौ. मिना ससाणे यांना उमेदवारी मिळाल्यास नितीन भाऊच्या रूपाने जनतेचे प्रश्न मार्गी लागणारा हक्काचा माणूस उपलब्ध होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांची आहे. तसेच आमदार रोहित ( दादा ) पवार यांचे ते खंदे समर्थक आहेत. आमदार साहेबांच्या माध्यमातून ते अनेक कामे मार्गी लावू शकतात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे.

सध्या नितीन ससाणे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांनी आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी, काँक्रीटीकरण हे प्रश्न मार्गी लावलेले आहेत तसेच परिसरातील शेतकरी वर्गासाठी पुर्ण दाबाने लाईट मिळवण्यासाठी आमदारांकडे पाठपुरावा करत शेतकर्यांचा लाईटचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने लाईट मिळत आहे.

शिऊर गणातील नायगाव हे तर त्यांचे गाव आहे याचबरोबर शिऊर, पाडळी, सारोळा, राजुरी, बांधखडक, वनवेवस्ती, तेलंगशी, जायभायवाडी, मोहरी, जातेगाव, सारोळा, काटेवाडी येथे मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार आहे. सर्वानीच मीना नितीन ससाणे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.

ससाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण ते आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून गणातील रस्ते, वीज, पाणी या मुलभूत समस्या प्राधान्याने सोडवू शकतात. वैयक्तिक लाभाच्या योजना खर्या गरजू व वंचित घटकांना मिळवून देऊ शकतात अशी अपेक्षा गणातील लोकांची आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे.