Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या तक्षशिला ज्युनियर कॉलेजचे संस्थापक तसेच ल. ना. होशिंग विद्यालयातील इंग्रजीचे शिक्षक संजय...

तक्षशिला ज्युनियर कॉलेजचे संस्थापक तसेच ल. ना. होशिंग विद्यालयातील इंग्रजीचे शिक्षक संजय कदम यांचे अल्पशा आजाराने निधन परिसरात शोककळा

0
278
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज——
जामखेड येथिल तक्षशिला ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष व ल. ना. होशिंग विद्यालयाचे इंग्रजीचे विनयशील शिक्षक संजय कदम याचे अल्पशा आजाराने निधन झाले.
 दिवंगत संजय कदम हे विद्यार्थी केंदित शिक्षक होते. त्यांच्या अचानक निधनामुळे जामखेड शहरातील व तालुक्यातील त्यांचे विद्यार्थी व सर्व परिचीत यांना मोठा धक्का बसला आहे.
   संजय कदम हे ल. ना. होशिंग विद्यालयात इंग्रजीचे शिक्षक म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या पत्नीही ल. ना. होशिंग विद्यालयात  शिक्षिका म्हणून नोकरीला आहेत. 
 कदम सरांचा अंत्यविधी संध्याकाळी  ६.०० वाजता अमरधाम  जामखेड येथे मोठ्या शोकाकुल वातावरणात झाला यावेळी मोठ्या संख्येने समुदाय उपस्थित होता. दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, प्राचार्य श्रीकांत होशिंग, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, एस एन पारखे, पोपट जरे, वंचित बहुजन आघाडीचे अँड अरूण जाधव, नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, विकी घायतडक, विकी सदाफुले, यांच्या सह दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं आई-वडील व भाऊ वहिनी असा परिवार आहे. त्यांनी मोठ्या परिश्रमाने तक्षशिला ज्युनियर कॉलेज, इंग्लिश मेडीयम स्कुल स्थापन केले आहे. त्यांच्या जाण्याने जामखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारी वृंदानी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!