Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या गरजवंताना मदत करणे हाच खरा धर्म-प्रा मधुकर राळेभात  जामखेड मिडिया क्लबच्या पदाधिकार्‍यांचा...

गरजवंताना मदत करणे हाच खरा धर्म-प्रा मधुकर राळेभात  जामखेड मिडिया क्लबच्या पदाधिकार्‍यांचा संत निरंकारी मंडळाच्या वतीने केला सत्कार  संत निरंकारी मंडळ जामखेडचे कार्य उल्लेखनीय -सुदाम वराट

0
287
जामखेड प्रतिनिधी
            जामखेड न्युज——
धर्माची संकल्पना सांगते की माणसाने माणसासारखे वागले पाहिजे. कारण धर्म म्हंटले की आनेक जातीच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवतो मात्र एखाद्या गरजवंताला मदत करणे हाच खरा धर्म आहे आसे मत प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी व्यक्त केले.
जामखेड येथिल संत निरंकारी मंडळाच्या वतीने जामखेड मधिल जामखेड तालुका मिडीया क्लबच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व प्रा. मधुकर राळेभात यांना कबड्डी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल कृतज्ञता पुरस्कार मिळाला त्या बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीगोंदा येथिल महात्मे व प्रवचनकार आमोल रसाळ, जामखेड तालुका मिडीया क्लबचे अध्यक्ष प्रा. सुदाम वराट (सर) जेष्ठ पत्रकार व कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, पत्रकार अविनाश बोधले पत्रकार किरण रेडे, अजय अवसरे, संपर्क प्रमुख धनराज पवार, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, 
गौतमशेठ बाफना, विजय जाधव सर, दिपक मोरे, राजाराम कांबळे, अखिलेश डाडर, आमोल जमदाडे, भरत देडे, विलास क्षिरसागर सह महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
यावेळी बोलताना जामखेड तालुका मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट म्हणाले की, अमित गंभीर यांच्या माध्यमातून संत निरंकारी मंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे. मंडळाचा मानवता हाच खरा धर्म, मानवता हिच जात व पंथ आहे. मंडळाचे कार्य गोरगरीब दीनदलित लोकांसाठी कार्य चालते. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता, पुस्तक पिढीला पुस्तके भेट अशी उल्लेखनीय कामे सतत सुरू असतात. 
   यावेळी काष्टी श्रीगोंदे येथील माहत्मे अमोल रसाळ यांचे प्रवचन झाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!