जामखेड न्युज——
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सरासरी ६० टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत. अशा मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी ‘साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ साठी २५ जूलै २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनीमादीग, मादींग, दानखणीमांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांगगारुडी, मांगगारोडी, मादगी व मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.
अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, फोटो, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टीफिकेट व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज व कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, सहकार सभागृह रोड, मार्केटयार्ड इमारत, २ रा मजला, महात्मा फुले चौक, अहमदनगर – ०२४१/२३२७५१’ या पत्त्यावर दोन प्रतीत अर्ज सादर करावा. किंवा ई-मेल – dmlasdcnagar@gmail.com वर सर्व कागदपत्रांसह २५ जूलै २०२२ पर्यंत अर्ज पाठवावा. असे आवाहनही जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.