जामखेड न्युज——
तालुक्यातील राजुरी येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे यांनी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांना साहित्य मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. तसेच गावात तीस एलईडी लॅम्प बसविले आहेत. यामुळे संपुर्ण गाव प्रकाशमय झाले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेवस्ती येथील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असणारे पुस्तक वाटप करण्यात आले यावेळी अस्लम शेख, दत्तात्रय मोरे पोलीस पाटील, पोपट पिसाळ, सागर भाऊ कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य बबन कोल्हे, मच्छिंद्र कोल्हे, विजय लटपटे, मोरे भाऊसाहेब, विलास कोल्हे, संजय चौभारे, माजी चेअरमन आश्रू काळदाते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय डोंगरे, विक्रम पाटील, युवा नेते वैभव कोल्हे, साईनाथ फुंदे,पोपट बोरकर, कृष्णा कोल्हे, स्वप्नील कोल्हे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी मुख्याध्यापक शेख सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेवस्ती मुख्याध्यापक सदाफुले सर,सह मित्र परिवार उपस्थित होते.

.
सागर कोल्हे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. कार्यसम्राट आमदार मा रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरी येथे नदीखोलीकरन च्या कामात महत्वाची भूमिका घेऊन 1 km नदीचे खोलीकरण केले आहे. यामुळे राजुरी गावात पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

तसेच राजुरी डोळेवाडी येथे बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून स्वखर्चाने 25 बाकडे बसवले आहेत,,30 LED लॅम्प बसवले आहेत.
येणाऱ्या काळात राजुरी गाव तालुक्यातील एक आदर्श गाव निर्माण केले जाईल. असेही कोल्हे यांनी सांगितले.