जामखेड न्युज——
जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार दि. ११ रोजी श्री साकेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

श्री साकेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पेन, वही व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, विजयकुमार हराळे, आण्णा विटकर यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेतील गरिब, होतकरू तसेच ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडिल नाहीत अशा विद्यार्थ्यांना प्राधान्याने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सुदाम वराट यांनी शालेय साहित्य वाटपाचा जो सामाजिक उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.