जामखेड न्युज——
जिल्ह्यातील विळद घाट येथील विखे पाटिल हॉस्पिटल येथून युवकाचे 4 अवयव ग्रीन कॉरिडॉर च्या माध्यमातून पुणे येथील विविध हॉस्पिटलमध्ये पोहचले जात आहे यामाध्यमातून चार व्यक्तींना या अवयवाचा लाभ होणार आहे.याबाबत ची माहिती खासदार डॉ सुजय विखे यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र मध्ये ही प्रथमच घटना आहे.यापूर्वी या हॉस्पिटल च्या माध्यमातून आतापर्यंत तीन महिन्यांत 4 किडनी ट्रान्सप्लांट केले असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटल आणि नाशिक येथील एका हॉस्पिटल येथे हे अवयव green energy coridor पाठवले जात आहेत.यामुळे चार रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.

खाजगी सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करणारा 25 वर्षीय युवकाचा आळेफाटा येथे अपघात झाल्याने तो जखमी झाला होता. दरम्यान त्याचा ब्रेन डेड झाला होता.नंतर त्याला आळेफाटा आणि संगमनेर येथे रुग्णालयात हलविण्यात आला होता.त्यांनतर त्याचा ब्रेन डेड झाल्याचे निदर्शनास आले.यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांचे मते घेण्यात आले होते.त्यांच्या मतानुसार ब्रेन डेड झाल्याचं सांगण्यात आले.त्यानुसार या युवकांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने 4 अवयव दान होत आहे.
ह्या युवकाचे लिव्हर सह्याद्री हॉस्पिटल येथे, किडनी ज्युपिटर हॉस्पिटल पुणे, एक किडनी अपोलो हॉस्पिटल नाशिक आणि पंक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल येथे रुग्णांना दिले जाणार आहे.या संदर्भात पुण्याच्या डॉक्टरची टीमने त्याचे अवयव दानाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर विशेष अम्ब्युलंसने green corridor हे हे अवयव पुणे आणि नाशिक येथे पाठविण्यात आले.