नऊ कोटींचे पॅकेज नाकारत अवघ्या २२ व्या वर्षी घेतला संन्यास जीवनात पैसाच सर्व काही नसतो आपल्या मनाचा आनंद कशात आहे हे महत्त्वाचे

0
292
जामखेड न्युज——
तरुण वयात प्रत्येकाला चांगल्या सरकारी किंवा खासगी नोकरीची अपेक्षा असते. पगारही चांगला हवा असते. मात्र, नऊ कोटी रुपयांचे पॅकेज मिळत असताना उच्चशिक्षित तरुणीने वयाच्या २२ व्या वर्षी संन्यास घेतला. B.B.A. उच्च शिक्षित, श्रीमंत, सर्व सुखसुविधा असूनही तरुण वयात तिने संन्यास घेतल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
२२ व्या वर्षी घेतला संन्यास
ही गोष्ट आहे दिक्षा बोरा (संयमश्रीजी महाराज) यांची. शिक्षण घेत असताना त्यांनी २०१३ ला जैन धर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तेथून त्यांनी निश्चय केला की, मला संन्याशी जीवन जगायचं. परंतु यासाठी घरच्यांची परवानगी हवी होती आणि घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी तब्बल आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. दिक्षा बोरा यांनी घराच्यांच्या संमतीने अखेरीस ९ डिसेंबर २०१९ रोजी धर्मप्रचारासाठी वयाच्या २२ व्या वर्षी संन्यास घेऊन घेतला. दिक्षा बोरा अताचे संयमश्रीजी महाराज यांनी BBA मधून पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केलं आहे. दिक्षा बोरा या राष्ट्रीय मॅरेथॉन खेळाडू आहेत तसेच शिक्षण घेत असताना क्रीडा, वादविवाद, कला, गायन, संभाषण आधी प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
सुखी जीवनाचा मूलमंत्र
दिक्षा बोरा यांचा संन्यास घेण्या अगोदरचा जीवन प्रवासही रंजक आहे. त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. तसेच त्या सुखव व श्रीमंत परिवारातून असून कॅलिफोर्निया येथील कंपनीने त्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या नोकरीसाठी तब्बल नऊ कोटीचे पॅकेज ऑफर केले होते. मात्र, ही संधी न स्वीकारता त्यांनी संन्यास घेणंच पसंत केलं. जीवनात पैसाच सर्व काही नसतो आपल्या मनाचा आनंद कशात आहे हे देखील महत्वाचे असते आणि आनंद गुरूच्या चरणी मिळतो म्हणून गुरुच्या चरणी विलिन होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नऊ कोटींचा आकडा ऐकल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटते परंतू मला अजूनही वाटत नाही की, मी नऊ कोटी रुपये सोडून आले. पैशामागे धावण्यापेक्षा आपण कमावलेल्या पैशात सुखी आहोत का? आपल्या जीवनात आपण सुखी आहोत का? याचा शोध आपण घेतला पाहिजे, अशी भावना दिक्षा बोरा (संयमश्रीजी महाराज) यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here