जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुका मिडीया क्लब या पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली असून संघटनेच्या प्रथम अध्यक्षपदी सुदाम वराट, उपाध्यक्षपदी अशोक वीर व श्वेता गायकवाड तर सचिवपदी सत्तार शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जामखेड येथिल केशर हाॅल येथे जामखेड तालुका मिडीया क्लब या पत्रकार संघटनेची बैठक पार पडली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार फायक अली सय्यद तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत, विश्वदर्शन न्युजचे संपादक गुलाब जांबळे व केशर हाॅल मंगल कार्यालयाचे संचालक डॉ. अनिल गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांची मनोगते झाली. यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर व श्वेता गायकवाड, सचिव सत्तार शेख, सहसचिव पप्पू सय्यद, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, खजिनदार राजेंद्र म्हेत्रे, सल्लागार संजय वारभोग, मार्गदर्शक गुलाब जांबळे, फायक अली सय्यद व प्रसिद्ध प्रमुख धनराज पवार तर कार्यकारणी सदस्य म्हणून किरण रेडे, अविनाश बोधले, अजय अवसरे, राजू भोगील यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.

चौकट
सर्वाच्या सहकार्याने एक आदर्श पत्रकार संघ म्हणून जामखेड मिडिया क्लब लवकरच नावलौकिक पावेल तसेच पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचा आरोग्य विमा उतरविला जाईल याचबरोबर पत्रकारांचा बचतगट करण्यात येईल महिन्यातून एकदा सहविचार सभा घेण्यात येईल असे यावेळी अध्यक्ष सुदाम वराट यांनी सांगितले.