सांगली कोल्हापूरातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळविणार -मुख्यमंत्री

0
308
जामखेड न्युज——
मुख्यमंत्र्यांची प्रशासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे. यावेळी मराठवाड्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूरातील पूराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 
यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज पार पडलेल्या बैठकीत जागतिक बँकेचे अधिकारीही उपस्थित होते. सांगली आणि कोल्हापूरमध्ये दोन वर्षापासून पूर येत आहे. यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार असून हे पूराचं पाणी मराठवाड्यात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी वाटपाचा कायदा पुराच्या पाण्याला लागू होत नाही म्हणून पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यात येणार आहे. बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार असून या प्रकल्पाला निधी देण्यासाठी जागतिक बँकेने सहमती दर्शवली असून या प्रकल्पाचा आराखडा बनवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाला जागतिक बँक मदत करणार आहे. आणि या निर्णयामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरसदृश्य भागातील लोकांना दिलासा मिळणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान पावसाचं जे पाणी समुद्रात वाहून जातं आणि जे पाणी आपण वापरू शकत नाही ते पाणी गोदावरी नदीत सोडण्याचा निर्णय सरकारने अगोदरच घेतला होता पण हे काम काही दिवसांपासून रखडलं होतं. हा प्रकल्प परत सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here